पुणे महापालिकेच्या विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध; पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:33 IST2026-02-24T11:33:30+5:302026-02-24T11:33:40+5:30

पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांनी उमेदवार उभे केले नसल्याने समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बिनविरोध निवड होणार असून, यावर २७ फेब्रुवारी रोजी शिक्कामोर्तब होणार आहे.

Pune Municipal Corporation's subject committee chairmen and vice-chairmen unopposed; Opposition withdraws due to lack of sufficient numbers | पुणे महापालिकेच्या विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध; पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांची माघार

पुणे महापालिकेच्या विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध; पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांची माघार

पुणे : महापालिकेच्या विषय समितींच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांनी उमेदवार उभे केले नाहीत. त्यामुळे समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बिनविरोध निवड होणार असून, यावर २७ फेब्रुवारी रोजी शिक्कामोर्तब होणार आहे.

‘प्रशासकराज’नंतर घेण्यात आलेल्या महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे पुण्याला तब्बल चार वर्षांनंतर लोकनियुक्त महापौर आणि उपमहापौर लाभले आहेत. यानंतर स्थायी समितीसह विषय समित्यांवर नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये स्थायीवर भाजपचे १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ३ आणि काँग्रेस १, अशा १६ तर शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण, विधी, क्रीडा आणि नाव या विषय समित्यांवर प्रत्येकी भाजपचे १०, राष्ट्रवादी (अजित पवार) २ आणि काँग्रेस १, अशा १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये स्थायी समितीवर भाजपचे १२, राष्ट्रवादी (अजित पवार) २ आणि काँग्रेस १, अशा १३ सदस्यांची नियुक्ती झाली आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड झाली असून, विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांसाठी सोमवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत केवळ भाजपच्या सदस्यांनीच अर्ज दाखल केली. महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार)ने पुरेसे संख्याबळ नसल्याने आणि अनेक नगरसेवक अजित पवार यांच्या शोकसभेसाठी मुंबईला गेल्याने विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांसाठी अर्ज केले नाहीत. त्यामुळे भाजपच्या सदस्यांची निवड बिनविरोध होणार आहे. यावर २७ फेब्रुवारी रोजी औपचारिकपणे शिक्कामोर्तब होणार आहे.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांवर बिनविरोध निवड होणारे भाजप नगरसेवक

विधी समिती - स्वरदा बापट (अध्यक्ष), पायल तुपे (उपाध्यक्ष)

शहर सुधारणा समिती - स्मिता वस्ते (अध्यक्ष), सपना छाजेड (उपाध्यक्ष)
महिला व बालकल्याण समिती - अल्पना वरपे (अध्यक्ष), तन्वी दिवेकर (उपाध्यक्ष)

क्रीडा समिती - नारायण गलांडे (अध्यक्ष), दिनेश माथवड (उपाध्यक्ष)
शिक्षण समिती - अरुण राजवाडे (अध्यक्ष), अतुल तरवडे (उपाध्यक्ष)

नाव समिती - पल्लवी जावळे (अध्यक्ष), सुनील पांडे (उपाध्यक्ष)

Web Title : पुणे निगम समिति अध्यक्ष निर्विरोध निर्वाचित; विपक्ष के पास संख्याबल नहीं

Web Summary : पुणे महानगरपालिका समितियों के अध्यक्ष और उपाध्यक्ष भाजपा उम्मीदवार निर्विरोध चुने गए क्योंकि विपक्ष के पास पर्याप्त संख्याबल नहीं था। औपचारिक पुष्टि 27 फरवरी को होनी है।

Web Title : Pune Corporation Committee Heads Elected Unopposed; Opposition Lacks Numbers

Web Summary : BJP candidates were elected unopposed as heads and deputy heads of Pune Municipal Corporation committees due to insufficient opposition numbers. Formal confirmation is scheduled for February 27th.