अजित  पवार यांच्या निधनामुळे पुणे मनपाचा वर्धापन दिन रद्द; सांस्कृतिक कार्यक्रमांनाही ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 10:34 IST2026-02-06T10:32:11+5:302026-02-06T10:34:19+5:30

या दु:खद घटनेमुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.

Pune Municipal Corporation's anniversary celebration cancelled due to Ajit Pawar's death; Cultural programs also on hold | अजित  पवार यांच्या निधनामुळे पुणे मनपाचा वर्धापन दिन रद्द; सांस्कृतिक कार्यक्रमांनाही ब्रेक

अजित  पवार यांच्या निधनामुळे पुणे मनपाचा वर्धापन दिन रद्द; सांस्कृतिक कार्यक्रमांनाही ब्रेक

पुणे  -  राज्यातील ज्येष्ठ नेते अजित दादा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने यंदाचा वर्धापन दिन साधेपणाने पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दु:खद घटनेमुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.

मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध सांस्कृतिक उपक्रम, कार्यक्रम आणि नागरिकांसाठी विशेष आयोजन केले जाते. मात्र, शहरावर शोककळा पसरलेल्या या परिस्थितीत उत्सवमूर्ती वातावरण टाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांना याची नोंद घेण्याचे आवाहन केले असून, दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाने सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शहरातील राजकीय व सामाजिक वर्तुळातही शोक व्यक्त केला जात आहे.

Web Title : अजित पवार के निधन से पुणे महानगरपालिका का स्थापना दिवस रद्द

Web Summary : अजित पवार के निधन के बाद पुणे महानगरपालिका ने अपना स्थापना दिवस समारोह और सांस्कृतिक कार्यक्रम रद्द कर दिया। आयुक्त नवल किशोर राम ने शोक की अवधि का सम्मान करते हुए यह निर्णय लिया। सभी कार्यक्रम रद्द कर दिए गए हैं, नागरिकों से बदलाव पर ध्यान देने का आग्रह किया गया है। शहर शोक में है।

Web Title : Pune Municipal Corporation Anniversary Cancelled Due to Ajit Pawar's Demise

Web Summary : Pune Municipal Corporation cancelled its anniversary celebrations and cultural events following Ajit Pawar's death. Commissioner Naval Kishore Ram announced the decision, citing respect for the mourning period. All programs are cancelled, and citizens are asked to note the change. The city is in mourning.