Holi 2026: होळीसाठी वृक्षतोड केल्यास दंडात्मक कारवाई; पुणे महापालिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:02 IST2026-02-27T11:00:54+5:302026-02-27T11:02:11+5:30

वृक्षतोड करताना आढळल्यास १८००१०३०२२२, व्हॉटस अॅप क्रमांक ९६८९९००००२ यावर किंवा www.complanit .punecorporation.org या तक्रार करण्याचे आवाहन केले आहे

Pune Municipal Corporation warns of penal action if trees are cut for Holi | Holi 2026: होळीसाठी वृक्षतोड केल्यास दंडात्मक कारवाई; पुणे महापालिकेचा इशारा

Holi 2026: होळीसाठी वृक्षतोड केल्यास दंडात्मक कारवाई; पुणे महापालिकेचा इशारा

पुणे : हाेळी सणासाठी अनधिकृतपणे वृक्षताेड केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या उद्यान विभागाने दिला आहे. तसेच होळीसाठी वृक्षतोड करू नये, असे आवाहनही केले आहे.

हाेळी सणासाठी शहरात ठिकठिकाणी, सार्वजनिक आणि खासगी रित्या हाेळी पेटविली जाते. यासाठी लाकूड किंवा गोवऱ्याचा वापर केला जातो. विना परवाना झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहचवणे असे कोणतेही कृत्य करणे हा गुन्हा आहे. असा गुन्हा करणाऱ्यांकडून एक लाख रुपयांपर्यंत दंड वसुल केला जाईल, त्यामुळे होळी सणाच्या निमित्ताने कोणत्याही वृक्षांची तोड करू नये. कोणतीही व्यक्ती विनापरवाना वृक्षतोडीत असल्यास किंवा वृक्षांचा विस्तार कमी केल्यास, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ चा कायद्यानुसार कारवाई केली जाईल. हा प्रकार कुठे आढळल्यास १८००१०३०२२२, व्हॉटस अॅप क्रमांक ९६८९९००००२ यावर किंवा www.complanit .punecorporation.org या तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title : होली 2026: पुणे में पेड़ काटने पर जुर्माना, मनपा की चेतावनी

Web Summary : पुणे महानगरपालिका ने होली के लिए अनधिकृत रूप से पेड़ काटने पर 1 लाख रुपये तक के जुर्माने की चेतावनी दी है। नागरिकों से पेड़ो को नुकसान से बचने और उल्लंघन की रिपोर्ट करने का आग्रह किया गया है।

Web Title : Holi 2026: Pune Warns Against Tree Felling; Penalties Apply

Web Summary : Pune Municipal Corporation warns of penalties up to ₹1 lakh for unauthorized tree felling for Holi. Citizens are urged to avoid tree damage and report violations to the provided helpline.