शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेने २ महिन्यांत थांबविले २२० बांधकाम; वायुप्रदूषण रोखण्यासाठी नियमांची पूर्तता न केल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:05 IST

मध्यवर्ती भागासह शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. विश्रांतवाडी, गणेशखिंड रस्ता यासह अन्य भागात उड्डाणपूल, रस्ते, मेट्रोची कामे सुरू आहेत

राजू हिंगे 

पुणे : पुण्यातील वाढते वायुप्रदूषण रोखण्यासाठी पुणे महापालिकेने ५ हजार चौरस मीटरवरील बांधकामांना बांधकाम करताना विविध नियमांची पूर्तता करणे बंधनकारक केले आहे. पण नियमांची पूर्तता न करताच बांधकाम करणाऱ्या २२० बांधकाम प्रकल्पांना दोन महिन्यांत कामे थांबविण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यापैकी १९३ बांधकाम प्रकल्पांना सर्व नियमांची पूर्तता केली आहे. त्यामुळे बांधकाम प्रकल्पांवरील स्थगिती उठविली आहे. मात्र, अद्यापही २७ बांधकाम प्रकल्पांना कामे थांबविण्याची नोटीस कायम आहे.

मध्यवर्ती भागासह शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. विश्रांतवाडी, गणेशखिंड रस्ता यासह अन्य भागात उड्डाणपूल, रस्ते, मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. यामुळे शहरात धोकादायक धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. बांधकाम व रस्त्यांसह इतर कामांच्या ठिकाणी होणाऱ्या धुळीमुळे शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. यामुळे नागरिकांना फुफ्फुस, रक्तवाहिन्या, डोळ्यांसंबंधित आजार होत आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) लागू केलेल्या मार्गदर्शक सूचना पालिकेने सर्व बांधकाम प्रकल्पांना बंधनकारक केल्या आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम विभागातील अभियंत्यांनी सर्वेक्षण करून उपाययोजना न केलेल्या २२० बांधकाम प्रकल्पांना गेल्या दोन महिन्यांत कामे थांबवा अशी नोटीस बजावली. त्यानंतर सर्व नियमांची पूर्तता करून १९३ बांधकाम प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत, असे पुणे महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

बांधकामावरील हवेच्या गुणवत्तेचा डॅशबोर्ड दिसणार ऑनलाईन

पुणे महापालिकेच्या हद्दीतील १५० बांधकाम प्रकल्पावर सध्या सेन्सर बसविले आहेत. आता सेन्सरचा डॅशबोर्ड आता ऑनलाइनपणे महापालिकेच्या पर्यावरण विभागामध्ये दिसणार आहे. त्यामुळे पालिकेच्या या प्रकल्पावरील हवा प्रदूषणावर ऑनलाइनरीत्या देखरेख ठेवता येणार आहे.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका करणार उपाययोजना

पुण्यातील वाढत्या वायुप्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महापालिका आणि भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) यांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये महापालिकेचे अधिकारी आणि ४ हवामान शास्त्रज्ञांचा समावेश आहे. ही समिती शहरातील वायुप्रदूषणावर लक्ष ठेवून ते कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे. वायुप्रदूषण नियंत्रणासाठी सविस्तर कार्य आराखडा तयार करून त्याची शास्त्रीय पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अंमलबजावणीसाठी तीन, सहा आणि बारा महिन्यांचे टप्पे निश्चित करण्यात येणार आहे. आयआयटीएमकडून वायुप्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Stops 220 Constructions in 2 Months Over Air Pollution Rules

Web Summary : Pune Municipal Corporation halted 220 construction projects for violating air pollution norms. 193 projects resumed after compliance. A joint committee will devise strategies to improve air quality, using online monitoring and scientific measures. The city aims for cleaner air through strict enforcement.
टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाpollutionप्रदूषणHealthआरोग्यcommissionerआयुक्तSocialसामाजिकMONEYपैसा