पुणे : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे प्रशासनाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले आहे. चार वर्षांच्या प्रशासक राजनंतर महापालिकेचे लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात येऊन स्थायी समिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे प्रशासनाने तयार केलेले अंदाजपत्रक आज स्थायी समितीला सादर केले. यंदा १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले आहे.
पुणे शहरातील वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद तर पुणे महापालिकेत पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक २०७७ कोटी रुपयांची तरतूद असणार आहे. मलनिस्सारण प्रकल्पाला १२१६ कोटी, घनकचरा व्यवस्थापन साठी १३९० कोटी तर पथ विभागाला १८६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागासाठी तब्बल ९७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भवन रचना विभासाठी ६५० कोटी, विद्युत विभागासाठी २६५ कोटी, समाज विकासाला १४३.५० कोटी रुपये, उद्यान विभागाला २०५ कोटी, आरोग्य विभागासाठी ८८ कोटी, नगर रचना नियोजनासाठी ६४.५० कोटी, पर्यावरण विभागाला ५१.५९ कोटी रुपये, माहिती व तंत्रज्ञान विभागाला ५६.७३ कोटी, हेरिटेज सेल साठी २८.५० कोटी पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाला १७१.३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Web Summary : Pune Municipal Corporation's ₹13,995 crore budget prioritizes water supply (₹2077 crore). Significant allocations include traffic planning (₹740 crore), sewage projects (₹1216 crore), waste management (₹1390 crore), roads (₹1866 crore), and primary education (₹979 crore).
Web Summary : पुणे महानगरपालिका का ₹13,995 करोड़ का बजट जल आपूर्ति (₹2077 करोड़) को प्राथमिकता देता है। यातायात योजना (₹740 करोड़), सीवेज परियोजना (₹1216 करोड़), कचरा प्रबंधन (₹1390 करोड़), सड़कें (₹1866 करोड़) और प्राथमिक शिक्षा (₹979 करोड़) के लिए महत्वपूर्ण आवंटन शामिल हैं।