शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

ओल्या कचऱ्याच्या अशास्त्रीय प्रकल्पामुळे पुणे महापालिकेचे दहा कोटी रुपये पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 11:00 PM

पुण्यातील कचरा प्रश्नावर शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही पुण्याचा कचरा प्रश्न अद्याप सुटलेला नाही..

ठळक मुद्देसंबंधित ठेकेदारावर घनकचरा विभागाकडून अद्यापही कारवाई नाही

पुणे : ओल्या कचऱ्यावर विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया करून थर्मल कम्पोस्टिंग या तंत्रज्ञानावर आधारित उभारण्यात आलेले प्रकल्प बंद पडले असून, पालिकेचे १० कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. यामुळे संबंधित ठेकेदारावर महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी दावा दाखल करण्याचे ठरले असतानाही, अद्यापही त्याच्यावर कोणतीच कारवाई अधिकाऱ्यांकडून केली गेलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.याबाबत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, शहरातील ७ ठिकाणी अशास्त्रीय प्रकल्प राबवून पालिकेचे १० कोटी रुपये कचऱ्यात घालणाऱ्या ठेकेदारावर खटला दाखल करावा व बंद पडलेले हे प्रकल्प अन्य कंपन्यांना द्यावेत. तसेच, बेजबाबदारपणे या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.पुण्यातील कचरा प्रश्नावर शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही पुण्याचा कचरा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. याचे महत्त्वाचे कारण साधकबाधक विचार न करता विविध कचरा प्रकल्पांवर वारेमाप खर्च करण्याची घनकचरा विभागाची प्रवृत्ती हेच असल्याचा आरोप वेलणकर यांनी केला आहे. २०१६ साली २४ तासांत कम्पोस्टिंग करून ओला कचरा जिरवण्याचा पूर्णपणे अशास्त्रीय प्रकल्प घनकचरा विभागाने करायचा घाट घातला व पुण्यात सात ठिकाणी ३६ टन ओल्या कचºयापासून कम्पोस्टिंग करण्याच्या या प्रकल्पाची टेंडर काढली. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात आलेला हा शहरातील पहिलाच प्रकल्प असताना, प्रायोगिक तत्त्वावर २-३ टनांचा एखादा प्रकल्प दोन वर्षे यशस्वीपणे राबवून मग पुढे जाणे सयुक्तिक होते.परंतु, ‘होऊ द्या खर्च’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या घनकचरा विभागाने १० कोटी रुपये खर्चाची ही योजना आणली व इतर प्रकल्पांप्रमाणे तीही फसली.मार्च २०१७ ते जून २०१८ हे १५ महिने रडतखडत हे प्रकल्प चालले. या काळात या प्रकल्पांच्या उभारणीपोटी संबंधित ठेकेदार कंपनीला ९.३८ कोटी रुपये देऊन टाकण्यात आले़ तसेच, कचरा प्रोसेसिंग फी म्हणूनही २४ लाख रुपये देतानाच, प्रकल्प चालवण्यासाठी आलेले काही लाख रुपयांचे वीजबिलही महापालिकेने भरले. मात्र, प्रकल्प चालत नसल्याने संबंधितांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झाला असतानाही अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नसून पालिकेचे कोट्यवधी रुपये अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे पाण्यात गेल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्नPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाVivek Velankarविवेक वेलणकर