शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

पुणे-मुंबई अंतर २३ मिनिटांत कापणार... पण कधी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 1:31 PM

मुंबई ते पुणे अशा ११७.५० किलोमीटरच्या हायपरलूप या अत्याधुनिक परिवहन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देहायपरलूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प : अनेक प्रश्न प्रलंबित; धिम्या गतीने काम सुरूअपेक्षित भूसंपादन, प्रस्तावित खर्च आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ६ ते ८ वर्षांचा कालावधीपहिला टप्पा ११.८० किलोमीटरचा पथदर्शी प्रकल्प पीएमआरडीए राबविणार ‘चाचणी ट्रॅक’ विकसित करून, त्यानंतर हा संपूर्ण प्रकल्प राबविण्याचा सरकारचा विचार

- अभिजित कोळपे - 

पुणे : मुंबई (बीकेसी) ते पुणे (वाकड)दरम्यानचे अंतर केवळ २३ मिनिटांत पार करता यावे, यासाठी ११७.५० किलोमीटरचा हायपरलूप हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णयदेखील झाला आहे. मात्र, मागील दोन वर्षांत या प्रकल्पाच्या घोषणेव्यतिरिक्त कोणतेही ठोस काम पुढे सरकले नसल्याची वस्तुस्थिती आहे. या प्रकल्पासाठी अपेक्षित भूसंपादन, लागणारा प्रस्तावित खर्च आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिलेला ६ ते ८ वर्षांचा कालावधी व सुरू असलेले काम यामुळे  हा प्रकल्प पूर्ण होण्यास २० ते २५ वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ............मुंबई ते पुणे अशा ११७.५० किलोमीटरच्या हायपरलूप या अत्याधुनिक परिवहन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. ताशी ४९६ किलोमीटर वेगाने केवळ २३ मिनिटांत हे अंतर पार करता येऊ शकते, असे निर्देशित करण्यात आले आहे. त्यासाठी तब्बल ७० हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली असून, दोन टप्प्यांमध्ये कामाचे नियोजन केल्याचे सांगण्यात येत आहे.पहिला टप्पा ११.८० किलोमीटरचा पथदर्शी प्रकल्प पीएमआरडीए राबविणार आहे. त्यासाठी ५ कोटींचा खर्च दाखवण्यात आला आहे. तर, दुसºया टप्प्यात मुंबई ते पुणे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्प येत्या ६ ते ८ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणार, असेही प्रस्तावित करण्यात आले आहे.पुणे-मुंबईदरम्यानच्या प्रवासाचा कालावधी अवघ्या २३ मिनिटांपर्यंत कमी करण्यासाठी ‘हायपरलूप’सारख्या अत्यंत वेगवान यंत्रणेची चाचपणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधा प्राधिकरणाच्या (महाआयडिया) माध्यमातून ‘चाचणी ट्रॅक’ विकसित करून, त्यानंतर हा संपूर्ण प्रकल्प राबविण्याचा सरकारचा विचार आहे. हायपरलूप टेक्नॉलॉजीज आणि डीपी वर्ल्ड यांनी हा प्रकल्प उभारण्याची तयारी दाखवली असून, त्यानुसार ‘मूळ प्रकल्प सूचक’ म्हणून त्यांची शिफारस करण्याचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. या संपूर्ण प्रकल्पाच्या जबाबदारीची हमी मूळ सूचकांकडून घेण्यात येणार आहे. ...........    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि पीएमआरडीएचे तत्कालीन आयुक्त किरण गित्ते यांनी सन २०१८मध्ये हायपरलूप या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आमेरिकेचा दौरा केला होता. 

मात्र, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प खुद्द आमेरिकेतही अजून प्रायोगिक पातळीवरच आहे. 

तेथे अजूनही चाचणी घेण्यात येत आहे. भारतात हा प्रकल्प कधी यशस्वी होईल, अशी साशंकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ........ठळक वैशिष्टये : मुंबई (बीकेसी) ते पुणे (वाकड) ११७.५० किलोमीटर अंतर२३ मिनिटांत प्रवासाचे उद्दिष्ट; ४९६ प्रतितास गती प्रस्तावित ७० हजार कोटींची परकीय गुंतवणूक होणारदोन टप्प्यांमध्ये काम करण्याचे नियोजनपहिला टप्पा ११.८० किलोमीटरचा पथदर्शी प्रकल्पपहिला टप्पा दोन ते अडीच वर्षांत राबविणार; ५ हजार कोटींचा खर्च दुसरा टप्पा : मुंबई ते पुणे प्रकल्पाची अंमलबजावणीसंपूर्ण प्रकल्प ६ ते ८ वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन........ 

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गPMRDAपीएमआरडीएDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGovernmentसरकार