शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

पुणे : लग्नाचं आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवलं व केला बलात्कार, कोर्टानं फेटाळला तरुणाचा जामीन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 2:17 PM

लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेलं व तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सकलेन जलाल मुल्ला या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पुणे - लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेलं व तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सकलेन जलाल मुल्ला या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिवाय, त्याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी फेटाळला. 

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलिसात फिर्याद दिली. सकलेन याने पीडित मुलीला लग्नाचे आमीष दाखवले. तिला 20 ऑगस्ट रोजी कोंढवा भागातून पळवून कात्रज परिसरात नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सकलेन याला अटक केली असून सध्या त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता पण या अर्जास अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. 

उपलब्ध पुराव्यांवरून प्रथमदर्शनी सकलेन याने हा गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. पीडित मुलीचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यासमोर जबाब नोंदविण्यात आलेला नाही. जामीन मिळाल्यास आरोपी साक्षीदारांवर दबाव आणण्याची आणि पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा अ‍ॅड. बोंबटकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सकलेन याचा जामीन फेटाळला. 

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारPuneपुणे