पुणेकरांनो इकडे लक्ष द्या..!धूलीवंदन निमित्त ३ मार्चला पुणे मेट्रो सेवा अर्धा दिवस बंद; दुपारी ३ नंतर नियमित सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:31 IST2026-03-02T17:30:50+5:302026-03-02T17:31:54+5:30

मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर व्यक्त केली असून, सणाच्या काळात सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

Pune Metro services to remain closed for half a day on March 3 on account of Dhuli Vandana; resumes regularly after 3 pm | पुणेकरांनो इकडे लक्ष द्या..!धूलीवंदन निमित्त ३ मार्चला पुणे मेट्रो सेवा अर्धा दिवस बंद; दुपारी ३ नंतर नियमित सुरू

पुणेकरांनो इकडे लक्ष द्या..!धूलीवंदन निमित्त ३ मार्चला पुणे मेट्रो सेवा अर्धा दिवस बंद; दुपारी ३ नंतर नियमित सुरू

पुणे  - धूलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील पुणेमेट्रोची प्रवासी सेवा ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.०० नंतर ते रात्री ११.०० पर्यंत मेट्रो सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर व्यक्त केली असून, सणाच्या काळात सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रवाशांसाठी सूचना

-सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० : मेट्रो सेवा बंद

-दुपारी ३.०० ते रात्री ११.०० : मेट्रो सेवा नियमित सुरू

-पर्यायी प्रवासासाठी PMPML बस किंवा इतर वाहतूक साधनांचा वापर करण्याचे आवाहन

Web Title : धूलिवंदन पर पुणे मेट्रो सेवा आधे दिन के लिए बंद: विवरण यहाँ

Web Summary : धूलिवंदन सुरक्षा के लिए पुणे मेट्रो 3 मार्च, 2026 को सुबह 6 बजे से दोपहर 3 बजे तक बंद रहेगी। सेवाएं दोपहर 3 बजे फिर से शुरू होंगी और रात 11 बजे तक चलेंगी। यात्रियों को वैकल्पिक रूप से PMPML बसों का उपयोग करने की सलाह दी जाती है। मेट्रो प्रशासन को असुविधा के लिए खेद है।

Web Title : Pune Metro Suspends Service Half-Day for Dhulivandan: Details Here

Web Summary : Pune Metro will halt services from 6 AM to 3 PM on March 3, 2026, for Dhulivandan safety. Services resume at 3 PM, running until 11 PM. Passengers are advised to use PMPML buses as an alternative. The metro administration apologizes for the inconvenience.