पुण्यात बोअरवेल खोदाईमुळे मेट्रो बोगद्याला खड्डा; घरमालक-ठेकेदारावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:43 IST2026-03-26T15:42:55+5:302026-03-26T15:43:46+5:30

याप्रकरणी पोलिसांनी मूळ घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

pune metro news borewell digging in Pune causes pothole in metro tunnel; Crime against homeowner-contractor | पुण्यात बोअरवेल खोदाईमुळे मेट्रो बोगद्याला खड्डा; घरमालक-ठेकेदारावर गुन्हा

पुण्यात बोअरवेल खोदाईमुळे मेट्रो बोगद्याला खड्डा; घरमालक-ठेकेदारावर गुन्हा

पुणे : शुक्रवार पेठेत शिवाजी रोडवरील भूमिगत मेट्रोच्या वर असलेला वाडा घरमालकाने पाडला. मात्र, तेथील जुनी बोअरवेल जिवंत करत असताना, ६० फुटांपेक्षा अधिक खोल खोदाई केल्याने मेट्रोच्या बोगद्याला ६ इंचाचा खड्डा पडला. मेट्रोच्या बोगद्याच्या सिमेंटच्या रिंगमधून पाणी पडू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पोलिसांनी मूळ घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक शंतनू गोरात्रा यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवार पेठेतील खडक पोलिस ठाण्याच्या समोर १४ मार्च रोजी दुपारी पाऊण वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ घरमालक धनंजय मोटे यांच्या घराच्या खालून भूमिगत मेट्रो गेलेली आहे. बोगद्याचे काम करतेवेळी त्या भागातील बाधित सर्व लोकांना त्या ठिकाणी मेट्रोच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या खोदकाम अगर बोअरवेल घेऊ नयेत, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. घरमालक धनंजय मोटे यांच्या परवानगीने जुनी बोअरवेल पुन्हा जिवंत केलेली आहे, असे सांगितले. ही बोअरवेल ६० फूट खोल घेतल्याचे सांगितले. या बोअरवेलमुळेच मेट्रोच्या बोगद्याची सिमेंट रिंग फुटून पाण्याची गळती झाल्याची त्यांची खात्री झाली.

Web Title : पुणे में बोरवेल खुदाई से मेट्रो सुरंग क्षतिग्रस्त; मामला दर्ज

Web Summary : पुणे में बोरवेल की खुदाई से मेट्रो सुरंग में 6 इंच का छेद हो गया। पानी के रिसाव से नुकसान का पता चला। पुलिस ने भूमिगत मेट्रो लाइन के पास अनधिकृत खुदाई के लिए मकान मालिक और ठेकेदार के खिलाफ मामला दर्ज किया, क्योंकि उन्होंने अनुमत गहराई 60 फीट से अधिक कर दी थी।

Web Title : Pune Metro Tunnel Damaged by Borewell Digging; Case Filed

Web Summary : Borewell digging in Pune caused a 6-inch hole in a metro tunnel. Water leakage revealed the damage. Police filed a case against the homeowner and contractor for unauthorized digging near the underground metro line after exceeding the permitted depth of 60 feet.