पुणेकरांसाठी खुश खबर...! हिंजवडी ते शिवाजीनगर 'या' दिवशी धावणार मेट्रो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:08 IST2025-12-24T15:07:30+5:302025-12-24T15:08:17+5:30
- केंद्र आणि राज्यातील भाजप सरकराने मेट्रो आराखड्याला मंजुरी ते प्रत्यक्ष मेट्रो धावायला लागणे हा अत्यंत कठीण प्रवास अवघ्या पाच वर्षांत पूर्ण केला आणि गेल्या चार वर्षांत तब्बल १० कोटी पुणेकरांनी मेट्रोचा प्रवास केला.

पुणेकरांसाठी खुश खबर...! हिंजवडी ते शिवाजीनगर 'या' दिवशी धावणार मेट्रो
पुणे :पुणेकरांनामेट्रोचा प्रवास उपलब्ध झाला पाहिजे, अशी पोकळ चर्चा पुणेकरांनी वीस वर्षे ऐकली. पण पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न भारतीय जनता पक्षानेच स्वप्नात उतरवले. डिसेंबर २०१६ मध्ये पुणे मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यास आज नऊ वर्षे पूर्ण झाली. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकराने मेट्रो आराखड्याला मंजुरी ते प्रत्यक्ष मेट्रो धावायला लागणे हा अत्यंत कठीण प्रवास अवघ्या पाच वर्षांत पूर्ण केला आणि गेल्या चार वर्षांत तब्बल १० कोटी पुणेकरांनी मेट्रोचा प्रवास केला.
२०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोसाठी पाठपुरावा सुरू केला. पंतप्रधान मोदी यांनी त्यास खंबीर पाठबळ दिले. डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे भूमिपूजन झाले. मोदी यांनीच मार्च २०२२ मध्ये पुणे मेट्रोचे उद्घाटनदेखील केले. पुणे मेट्रोचे काम विक्रमी वेळेत पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि पुण्याचे तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्राधान्याने लक्ष दिले.
आता पुण्यातील दोन मार्ग पूर्णतः कार्यान्वित झाले असून दररोज दोन लाख पुणेकर मेट्रोच्या सुरक्षित, आरामदायी, वातानुकूलित प्रवासाचा आनंद घेत आहेत. एवढेच नव्हे तर नजीकच्या भविष्यात आणखी १३४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग टप्प्याटप्प्याने पुणेकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. भाजपने सत्तेवर येताच मेट्रोला गती दिली आणि अवघ्या तीस महिन्यांमध्ये चाचणीपर्यंतचा टप्पा गाठणारी पुणे मेट्रो ही देशातली पहिलीच मेट्रो ठरली.
मार्च २०२६ पर्यंत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल झालेली असेल. यामुळे आयटी क्षेत्रातील नोकरदारांची मोठी सोय होईल. त्याचसोबत पीसीएमसी-निगडी हा मार्गदेखील लवकरच सुरू होईल. वनाझ-चांदणी चौक, रामवाडी-वाघोली, सिव्हिल कोर्ट-लोणी काळभोर, खडकवासला-खराडी, एसएनडीटी-वारजे-माणिक बाग या मेट्रो मार्गांना देखील मंजुरी मिळाली आहे. यामुळे पुण्याच्या चारही दिशांना मेट्रो उपलब्ध होईल. - गणेश बिडकर, माजी सभागृह नेते, पुणे महापालिका