माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला वेग द्या ..! ३१ मार्चपर्यंत १२ स्थानके सुरू करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 09:31 IST2026-03-05T09:30:11+5:302026-03-05T09:31:07+5:30

- येत्या ३१ मार्चपर्यंत पहिल्या १२ स्थानकांपर्यंत मेट्रो कार्यान्वित करा, असा इशारा देण्यात आला आहे.

pune metro Give speed to Maan-Hinjawadi-Shivajinagar Metro Instructions to open 12 stations by March 31 | माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला वेग द्या ..! ३१ मार्चपर्यंत १२ स्थानके सुरू करण्याचे निर्देश

माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला वेग द्या ..! ३१ मार्चपर्यंत १२ स्थानके सुरू करण्याचे निर्देश

पुणे :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ (पीआयटीसी) यांच्या माध्यमातून उभारली जात असलेल्या माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाचा मंदावला आहे. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्री कार्यालयाने हस्तक्षेप केला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत पहिल्या १२ स्थानकांपर्यंत मेट्रो कार्यान्वित करा, असा इशारा देण्यात आला आहे.

आयटी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही मार्गिका मूळ नियोजनानुसार मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांमुळे कामे रखडल्याने प्रकल्पाला २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरीदेखील प्रत्यक्षात स्थानकांवरील अनेक कामे अद्याप अपूर्ण असून, कामे अपेक्षित वेगाने होत नसल्याचे चित्र आहे. उर्वरित मेट्रो स्थानके, स्थानकांची अंतर्गत सजावट, सुरक्षा यंत्रणा आणि तांत्रिक चाचण्या यामध्ये विलंब होत आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांसह दैनंदिन प्रवाशांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे दररोज हजारो कर्मचारी ये-जा करतात. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक परिवहनाला चालना देण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आता दिलेल्या मुदतीत किमान पहिला टप्पा सुरू होतो का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Web Title : माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो में तेजी लाएं; 31 मार्च तक 12 स्टेशन शुरू!

Web Summary : मुख्यमंत्री कार्यालय ने पुणे मेट्रो परियोजना में हस्तक्षेप किया। पहले 12 स्टेशन 31 मार्च तक चालू होने चाहिए। आईटी के लिए महत्वपूर्ण परियोजना में 2025 की मूल समय सीमा से परे देरी हो रही है, जिससे अधूरे स्टेशन के काम और यातायात की भीड़ के कारण यात्रियों में निराशा है।

Web Title : Speed up Man-Hinjewadi-Shivajinagar Metro; 12 stations by March!

Web Summary : Chief Minister's Office intervenes in delayed Pune Metro project. First 12 stations must be operational by March 31st. The project, vital for IT, faces delays beyond the original 2025 deadline, frustrating commuters due to incomplete station work and traffic congestion.