Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:01 IST2025-06-16T13:58:58+5:302025-06-16T14:01:44+5:30

Pune Maval Bridge Collapse News: पुण्यातील इंद्रायणी नदीत पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.

pune maval bridge collapse News Updates Today | Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन

Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन

इंद्रायणी नदीत कोसळलेल्या कुंडमळा पुलाचा लोखंडी सांगाडा बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला तीन क्रेन बोलावण्यात आल्या. मात्र, त्यांच्याकडून सांगाडा बाहेर निघाला नाही. त्यानंतर जास्त क्षमतेची क्रेन मागविण्यात आली. तोपर्यंत अंधार झाला होता. त्यामुळे विद्युत दिव्यांच्या प्रकाशात सांगाडा हलविण्याचे काम सुरू होते. क्रेनच्या साह्याने सांगाडा बाहेर काढण्यात अडचणी येत असल्याने कटरच्या साह्याने सांगाडा कापण्यात आला. त्यानंतर मोठ्या क्षमतेच्या क्रेनच्या साह्याने सांगाडा नदीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

पुलाच्या सांगाड्याखाली काहीजण अडकले होते. बचाव पथकांनी त्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढले. तसेच सायंकाळपर्यंत दोन मृतदेह काढण्यात आले. त्यात एका मुलाचा मृतदेह असल्याचेही पोलिसांनी सांगितले. मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली असून, प्रवाह प्रचंड वेगवान झाला आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. एनडीआरएफची तुकडी आल्यानंतर बचावकार्याला वेग आला. राज्याचे मंत्री गिरीश महाजन, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, भंडारा डोंगर देवस्थान अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी घटनास्थळाला भेट दिली.

पूल कोसळण्याचे कारण अद्याप अस्पष्ट
या पुलाची बांधणी किती वर्षांपूर्वी झाली होती, त्याची देखभाल कितपत केली जात होती, याबाबत सध्या काहीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. २४ तास मदतकक्ष सुरू: तहसील कार्यालय, मावळ येथे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत २४ तास मदत कक्ष कार्यरत आहे. नागरिकांनी मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा : हेल्पलाइन क्रमांक: ०२११४-२३५४४०.

Web Title: pune maval bridge collapse News Updates Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.