शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: मुळा - मुठा नदी पात्रात शेकडो ट्रक राडारोडा; हेच का सुशोभीकरण? धक्कादायक प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:15 IST

रस्त्यावरून ये - जा करणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येत असताना महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना कसा दिसला नाही?

हिरा सरवदे 

पुणे : नदी सुधार प्रकल्पांतर्गत महापालिकेकडून संगमवाडी ते मुंढवा पुल या दरम्यान नदी काठ सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पाच्या आडून मुंढवा पुलाच्या पूर्वेस आणि केशव नगरच्या बाजूस नदी पात्रात शेकडो ट्रक राडारोडा टाकून एक मोठा प्लॉट तयार केला जात आहे. हा प्रकार पाहता क्षणी रस्त्यावरून ये - जा करणाऱ्यांच्या लक्षात येत असताना महापालिका  आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना कसा दिसला नाही ? हा प्रकार नेमका कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे ? असे सवाल उपस्थित होत आहेत. 

गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर महापालिकेने मुळा-मुठा नदीचे सुशोभिकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. नदी सुधार प्रकल्पांतर्गत नदी काठचे ४४ कि.मी लांबीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ४ हजार ७२७ कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्पाचे काम ११ टप्प्यात करण्यात येणार असून त्यापैकी तीन टप्प्याचे काम प्रायोगिक तत्वावर करण्यात येत आहे. एका टप्प्यासाठी येणारा ७०० कोटी रुपये खर्च महापालिकेच्या निधीतून तर उर्वरित खर्च पीपीपी तत्वावर करण्यात येणार आहे. प्रकल्पातील टप्पा क्र. ९ मध्ये संगमवाडी ते बंडगार्डन या ३.७ किलो मीटर लांबीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर टप्पा क्र. १० व ११ बंडगार्डन ते मुंढवा या दरम्यानचे ५.३ किलो मीटरचे काम पीपीपी तत्वावर केले जात आहे. 

नदी काठ सुशोभिकरणाचे काम संगमवाडी ते मुंढवा या दरम्यानच सुरू आहे. मुंढवा व खराडीला जोडणाऱ्या पुलापासून पश्चिमेकडे प्रकल्पाचे काम सुरू आहे. पुलाच्या पूर्वेस केवळ कामासाठी येणारी वाहने खाली उतरण्यासाठी अॅप्रोच (जोड) रस्ता करण्यात आला आहे. पुलाच्या पूर्वेस नदी सुशोभीकरण प्रकल्प नाही. मुंढवा पुलापासून पूर्वेस नदीचे पात्र रुंद आणि खोलगट आहे. असे असताना खोलगट असलेल्या नदी पात्रात केशव नगरच्या बाजूने पुलापासून जवळपास दोनशे ते तीनशे मीटर लांब बांधकामाचा राडारोडा टाकून एक मोठा प्लॉट तयार करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी हजार ते बाराशे ट्रक राडारोडा टाकून पुलाच्या उंची एवढा पट्टा तयार करण्यात आला आहे. नदी सुशोभीकरणाचे काम आणि या ठिकाणी टाकण्यात आलेला राडारोडा यामधील फरक रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांच्या सहज लक्षात येतो.

नदी पात्रात अनधिकृतपणे राडारोडा टाकून प्लॉट तयार करण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू असणार, हे पाहता क्षणी लक्षात येते. शिवाय सामान्य नागरिकांना रस्त्यावरून जाता समजते की येथे काहीतरी बेकायदेशीर सुरू आहे, असे असताना महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कसे लक्षात आले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. 

प्लॉट तयार करण्याचे काम कोणाच्या आशिर्वाद?

महापालिकेच्या अनेक विभागातील किंवा जलसंपदा विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी व्हिजीटच्या नावाखाली कार्यालय सोडून सर्वत्र फिरत असतात. अशा वेळी कोणी व्यक्ती किंवा वाहन सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकताना दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. नदी सुशोभीकरण प्रकल्प मुंढवा पुलापर्यंत आहे, हे सर्वांना माहिती असताना केशवनगर परिसरातील हा शेकडो ट्रक राडारोडा टाकण्याचा प्रकार प्रशासनाला कसा दिसला नाही. या प्रकाराला कोणाचा राजकीय आशिर्वाद आहे का ? या प्लॉटचा वापर व्यावसायिक कारणासाठी करण्याचे कुणाचे नियोजन आहे का ? याचा शोध घ्यावा लागणार आहे.

याचा प्रकल्पाचा काहीही संबंध नाही 

केशव नगर परिसरात नदी पात्रात टाकण्यात आलेल्या राडारोडाचे काही फोटो व व्हिडीओ महापालिकेच्या काही आजी माजी अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर त्यांनी हा राडारोडा आणि नदी सुशोभीकरण प्रकल्पाचा काहीही संबंध नाही. अशा प्रकारे नदी पात्रात राडारोडा टाकता येत नाही, असे मत व्यक्त केले. 

महापालिका याकडे गांभीर्याने पाहणार का?

महापालिका भवन पासून हाकेच्या अंतरावर नदी पात्रात बांधकामाचा काही ट्रक राडारोडा टाकणाऱ्या एका डेव्हलपरवर महापालिकेने मागील पंधरा दिवसात कारवाई केली. या कारवाईत संबंधित बिल्डरची बांधकाम साईट सील करून दहा लाखाचा दंड केला. आता तर शेकडो ट्रक राडारोडा केशवनगर परिसरात नदी पात्रात टाकण्यात आला आहे, या प्रकाराकडे महापालिका प्रशासन गांभिर्याने पाहणार की जलसंपदाकडे जबाबदारी ढकलणार, हे पहावे लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune River Beautification: Illegal dumping raises concerns; authorities silent?

Web Summary : Pune's river beautification project faces scrutiny as illegal dumping of debris raises environmental concerns. Hundreds of trucks have deposited waste, creating an unauthorized plot in the riverbed. Questions arise about administrative oversight and potential political backing.
टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmula muthaमुळा मुठाriverनदीpollutionप्रदूषणWaterपाणीPoliticsराजकारणcommissionerआयुक्तMONEYपैसा