हॉर्न वाजवल्याचा वाद; बापलेकाची महिलांसह तिघांना फायटरने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:07 IST2025-01-10T14:02:41+5:302025-01-10T14:07:09+5:30

ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवल्यामुळे हल्लेखोरांनी फायटरने हल्ला करत कुटुंबाला मारहाण केली.

Pune - Horn honking dispute; Three people including a woman from Bapleka beaten up by a fighter | हॉर्न वाजवल्याचा वाद; बापलेकाची महिलांसह तिघांना फायटरने मारहाण

हॉर्न वाजवल्याचा वाद; बापलेकाची महिलांसह तिघांना फायटरने मारहाण

- किरण शिंदे

पुणे - पुण्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मुंढवा परिसरात वाहतुकीदरम्यान हॉर्न वाजवल्यामुळे एका कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा प्रकार केवळ ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवल्यामुळे घडला आहे. ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवल्यामुळे हल्लेखोरांनी फायटरने हल्ला करत कुटुंबाला मारहाण केली. या घटनेने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार काल रात्री नऊ वाजता मुंढवा कोरेगाव पार्क रोडवर घडला. फिर्यादी राजेश वाघचौरे हे त्यांच्या परिवारासोबत कोरेगाव पार्क दिशेने जात असताना मुंढवा कोरेगाव पार्क रोड वर एका ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने पुढील गाडीला हॉर्न दिला. या गोष्टीचा राग आल्याने पुढे असलेल्या राजू गायकवाड आणि त्यांच्या मुलगा शुभम गायकवाड याने गाडीतून उतरत वाघचौरे यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर त्यांच्या जवळील फायटरने त्यांच्यावर हल्ला केला. इतकंच नाही तर सोबत असलेल्या कुटुंबियांवर सुद्धा त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.या हल्ल्यात राजेश नाथोबा वाघचौरे त्यांच्या पत्नी सुवर्णा राजेश वाघचौरे आणि मुलगी संस्कृती राजेश वाघचौरे हे तिघे ही जणं जखमी झाले. याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांना अटक केली आहे अधिक तपास सुरू आहे. 

Web Title: Pune - Horn honking dispute; Three people including a woman from Bapleka beaten up by a fighter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.