Pune Grand Tour 2027: पहिल्या हंगामाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दुसरी पुणे ग्रँड टुर २६ ते ३१ जानेवारीला, स्पर्धेचे यंदा ६ टप्पे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 10:39 IST2026-04-09T10:38:20+5:302026-04-09T10:39:23+5:30

Pune Grand Tour 2027 या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैभवाची झलक एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळणार आहे

Pune Grand Tour 2027 Spontaneous response to the first season; Second Pune Grand Tour from January 26 to 31, 6 stages of the competition this year | Pune Grand Tour 2027: पहिल्या हंगामाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दुसरी पुणे ग्रँड टुर २६ ते ३१ जानेवारीला, स्पर्धेचे यंदा ६ टप्पे

Pune Grand Tour 2027: पहिल्या हंगामाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दुसरी पुणे ग्रँड टुर २६ ते ३१ जानेवारीला, स्पर्धेचे यंदा ६ टप्पे

पुणे: देशात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या पुणे ग्रँड टुरच्या पहिल्या हंगामाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता या स्पर्धेचे दुसरे पर्व २६ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेचा प्रारंभ प्रजासत्ताकदिनी होणार असून, समारोप ३१ जानेवारी रोजी अर्थात सुटीच्या दिवशी ठेवण्यात आले असून, यामुळे पुणेकरांना कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते, वाहतूक व्यवस्थापन आणि स्पर्धेच्या मार्ग निश्चितीसंदर्भात आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये आणि पुणेकरांना स्पर्धेचा आनंद मनमुराद घेता यावा, या उद्देशाने नियोजनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार स्पर्धेचा पहिला टप्पा मुळशी प्राधिकरणातील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर ते हिंजवडी असा निश्चित करण्यात आला आहे.

या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैभवाची झलक एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळणार आहे. सिंहगड परिसर, सासवडचा वारसा, जुन्नर-राजगुरुनगरचा ऐतिहासिक पट्टा तसेच लोणावळा-खंडाळ्याचा निसर्गरम्य घाट यामुळे स्पर्धेला विशेष आकर्षण लाभणार आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि स्वयंसेवक व्यवस्थापनाबाबत सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना वाहतूक खोळंबा जाणवू नये यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच नियोजनबद्ध तयारी सुरू असून, त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार असल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले.

यावर्षी झालेल्या स्पर्धेमुळे पुण्याची ओळख जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे. आगामी पुणे ग्रँड टुर ही स्पर्धा त्यापेक्षाही अधिक भव्य, नियोजनबद्ध आणि यशस्वी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून, ही स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता पुणे जिल्ह्याच्या पर्यटन, क्रीडा आणि आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

स्पर्धेचे टप्पे

पहिला टप्पा (मुळशी ते हिंजवडी) - २६ जानेवारी (मंगळवार)
दुसरा टप्पा (बारामती ते सासवड) - २७ जानेवारी (बुधवार)
तिसरा टप्पा (जुन्नर ते राजगुरुनगर) - २८ जानेवारी (गुरुवार)
चौथा टप्पा (आळंदी ते लोणावळा/खंडाळा) - २९ जानेवारी (शुक्रवार)
पाचवा टप्पा (लोणावळा/खंडाळा ते हिंजवडी) - ३० जानेवारी (शनिवार)
सहावा व अंतिम टप्पा (पीसीएमसी ते बाळगंधर्व रंगमंदिर) - ३१ जानेवारी (रविवार)

Web Title : पुणे ग्रैंड टूर 2027: छह चरणों के साथ दूसरा सीज़न घोषित

Web Summary : उत्स्फूर्त प्रतिक्रिया के बाद, पुणे ग्रैंड टूर का दूसरा सीज़न 26-31 जनवरी, 2027 को आयोजित किया जाएगा। छह चरणों की दौड़ पुणे जिले की ऐतिहासिक और प्राकृतिक सुंदरता को प्रदर्शित करती है, जिसमें सिंहगढ़, जुन्नर और लोनावाला के रास्ते शामिल हैं। आयोजकों का लक्ष्य पर्यटन और अर्थव्यवस्था को बढ़ावा देने वाला एक भव्य, सुनियोजित कार्यक्रम है।

Web Title : Pune Grand Tour 2027: Second Season Announced with Six Stages

Web Summary : Following enthusiastic response, Pune Grand Tour's second season will be held January 26-31, 2027. The six-stage race showcases Pune district's historical and natural beauty, with routes through Sinhagad, Junnar, and Lonavala. Organizers aim for a grander, well-planned event boosting tourism and economy.