पुणे: प्रेयसी गर्भवती राहिली, इंजिनिअर तरुणाने थेट...; तरुणी पुण्यात आल्यावर फुटलं सगळं बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:27 IST2025-07-11T14:26:20+5:302025-07-11T14:27:45+5:30

Pune Crime news: पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये एका इंजिनिअर तरुणाचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये शरीरसंबंध आले. त्यातून ती गर्भवती राहिली आणि...

Pune: Girlfriend got pregnant, young engineer got married directly...; When the young woman came to Pune, everything went wrong | पुणे: प्रेयसी गर्भवती राहिली, इंजिनिअर तरुणाने थेट...; तरुणी पुण्यात आल्यावर फुटलं सगळं बिंग

पुणे: प्रेयसी गर्भवती राहिली, इंजिनिअर तरुणाने थेट...; तरुणी पुण्यात आल्यावर फुटलं सगळं बिंग

Pune Crime Latest news: महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१८ पासून दोघे रिलेशनशिपमध्ये आले. लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या आणि दोघांमध्ये शरीरसंबंधही झाले. पण, काही दिवसांपूर्वी तरुणीला दिवस गेल्याचे कळले आणि इंजिनिअर तरुणाने जे केले, ते ऐकून तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तरुणीला कळू न देता तरुणाने तिला रबडी घ्यायला दिली. याच रबडीमध्ये त्याने गर्भपाताची औषधी मिसळली होती. हे इतक्यावरच थांबलं नाही. जेव्हा तरुणीने नीट धांडोळा घेतला तेव्हा तरुणाचे अनेक मुलींसोबत प्रकरण सुरू असल्याचेही समोर आले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आदर्श वाल्मिक मेश्राम (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. तो हिंजवडीतील एका खासगी कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. तो आणि तरुणी २०१८ पासून सोबत आहेत. 

गर्भपातासाठी भयंकर उपाय

काही दिवसांपूर्वी तरुणी गर्भवती असल्याचे आदर्शला कळले. त्याने ३ जुलै रोजी तिला रबडी खायला दिली. या रबडीमध्ये त्याने गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधी मिसळली होती. त्यामुळे तरुणीची तब्येत बिघडली. ती उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली. तपासण्या केल्यानंतर हा प्रकार समोर आला. 

आदर्शचे मुलींसोबत संबंध असल्याचा तरुणीचा आरोप  

तरुणी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, २३ जून रोजी आदर्शचा वाढदिवस होता. ती यवतमाळवरून पुण्यात आली होती. त्यावेळी तिने आदर्शचा मोबाईल बघितला. त्यात त्याचे अनेक मुलींसोबतचे संभाषण, फोटो होतो. त्याची एक एक्स गर्लफ्रेंडही तरुणीला भेटली. तिनेही आदर्शने फसवले असल्याचे सांगितले. 

तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, २०२४ मध्ये एका हॉटेलमध्ये आदर्श तिला घेऊन गेला. तिथे त्याने जबरदस्ती केली. तिने विरोध केला असता, त्याने तिला मारहाण केली आणि संबंध ठेवले. त्याने लग्न करू असेही तरुणीला सांगितले होते. पण, वारंवार विषय काढूनही तो टाळाटाळ करत होता. त्यातच ती गर्भवती राहिली. त्याने याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आणि गर्भपातासाठी भयंकर उपाय केला. या सगळ्या प्रकारानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. 

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune: Girlfriend got pregnant, young engineer got married directly...; When the young woman came to Pune, everything went wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.