Pune: तरुणावर गोळीबार, इंदापूर महाविद्यालयासमोरची घटना, इंदापुरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 21:06 IST2024-09-30T20:45:18+5:302024-09-30T21:06:08+5:30
Pune Crime News: युवकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना आज रात्री पावणेसात वाजण्याच्या सुमारास इंदापूर महाविद्यालयासमोर घडली. युवकाच्या पाठीवर चार गोळ्या लागल्याचे समजते. त्याला गंभीर अवस्थेत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Pune: तरुणावर गोळीबार, इंदापूर महाविद्यालयासमोरची घटना, इंदापुरात खळबळ
- शैलेश काटे
इंदापूर - युवकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना आज ( दि.३०) रात्री पावणेसात वाजण्याच्या सुमारास इंदापूर महाविद्यालयासमोर घडली. युवकाच्या पाठीवर चार गोळ्या लागल्याचे समजते. त्याला गंभीर अवस्थेत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुल अशोक चव्हाण (वय २५ वर्षे रा.शिरसोडी ता इंदापूर)असे जखमी युवकाचे नाव आहे. पावणेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. नेमक्या त्यावेळी इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच राहुल याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.हा प्रकार झाल्याचे समजताच घटनास्थळाभोवती मोठी गर्दी झाली होती. सतत रहदारी चालू असणाऱ्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत हक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वृत्त लिहीपर्यंत हल्ल्याचा उद्देश व आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही.