Video : पुण्यातील शिवाजीनगरमध्ये अण्णा हॉटेलला आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:32 IST2026-02-20T13:30:35+5:302026-02-20T13:32:38+5:30
पुणे अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Video : पुण्यातील शिवाजीनगरमध्ये अण्णा हॉटेलला आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
पुणे - पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील शिरोळे रस्त्यावर असलेल्या अण्णा हॉटेल येथे शुक्रवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं.
घटनेची माहिती मिळताच पुणेअग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, हॉटेलच्या किचन भागातून धूर येताना दिसल्याने लगेच पोलिस व अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. शॉर्ट सर्किट किंवा गॅस गळतीमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्यामुळे शिरोळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याचे आवाहन केले. अग्निशमन दलाकडून आग पूर्णपणे विझवल्यानंतर पंचनामा करून पुढील तपास केला जाणार आहे.