Pune fire : जंगली महाराज रस्त्यावर खाजगी गॅरेजला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:47 IST2025-12-26T15:45:54+5:302025-12-26T15:47:27+5:30
जंगली महाराज रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या खाजगी गॅरेजला अचानक आग लागली.

Pune fire : जंगली महाराज रस्त्यावर खाजगी गॅरेजला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी
पुणे - पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर आज आगीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जंगली महाराज रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या खाजगी गॅरेजला अचानक आग लागली.
जंगली महाराज रस्त्यावर खाजगी गॅरेजला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी #pune#firepic.twitter.com/IqfqZmJ5dQ
— Lokmat (@lokmat) December 26, 2025
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच वाहनांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीमुळे गॅरेजमधील साहित्य आणि वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे. आगीमुळे काही काळ जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.