प्रभाग रचनेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 09:19 IST2025-10-10T09:18:49+5:302025-10-10T09:19:03+5:30
- कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-के. ई. एम. (प्र. क्र. २४) बाबत ही याचिका दाखल

प्रभाग रचनेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका
पुणे :पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्यात सत्ताधारी महायुती सरकारने दबाव तंत्राचा वापर करत मनमानी पद्धतीने प्रभाग रचना केल्याचा आरोप होत आहे. प्रभागरचना करताना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याने प्रभागातील आरक्षण धोक्यात आले आहे, असा आरोप करून आरक्षण बचाव कृती समितीने या विरोधात थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-के. ई. एम. (प्र. क्र. २४) बाबत पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि कृती समितीचे समन्वयक नितीन परतानी यांनी ही याचिका दाखल केली. या प्रभागातून अनुसूचित जातीच्या सुमारे २० हजार मतदारांची नावे कमी झाली आहेत. त्यामुळे तेथे अनुसूचित जातीचे आरक्षण पडणार नाही, असा दावा कृती समितीने आपल्या याचिकेत केला आहे.