Pune: मध्यवर्ती भागात ‘ड्राय डे’; दारूबंदीचा आदेश झुगारून विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 19:12 IST2025-08-28T19:12:27+5:302025-08-28T19:12:35+5:30

शुक्रवार पेठेतील शाहू चौक परिसरात एका उपाहारगृहाच्या पाठीमागील खोलीत बेकायदा मद्य विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

Pune: 'Dry Day' in central area; Case registered against three for selling liquor in defiance of ban order | Pune: मध्यवर्ती भागात ‘ड्राय डे’; दारूबंदीचा आदेश झुगारून विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

Pune: मध्यवर्ती भागात ‘ड्राय डे’; दारूबंदीचा आदेश झुगारून विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यात मद्य विक्रीला बंदी (ड्राय डे) असताना शहराच्या मध्यवर्ती भागात उघड दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा टाकून खडक पोलिसांच्या पथकाने देशी, विदेशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

वैभव विजय डोंगरे (वय २६), गुड्डू कुमार भोलाकुमार कुमार (वय २६) आणि मटका अड्डा चालक नंदू नाईक (रा . सर्व. शुक्रवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी आशिष चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२७) पुणे शहर आणि जिल्ह्यात मद्य विक्रीला बंदी होती. त्यामुळे दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची नजर होती. शुक्रवार पेठेतील शाहू चौक परिसरात एका उपाहारगृहाच्या पाठीमागील खोलीत बेकायदा मद्य विक्री सुरू असल्याची माहिती पोलिस कर्मचारी आशिष चव्हाण यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने छापा टाकून दारू विकणाऱ्या वैभव डोंगरे व गुडुकुमार यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, रोख रक्कम आणि मोबाइल संच असा एक लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी नाईकसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Pune: 'Dry Day' in central area; Case registered against three for selling liquor in defiance of ban order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.