बदली शिक्षक ठेवणे पडले महागात, महिला शिक्षिका निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 09:28 IST2025-03-27T09:28:27+5:302025-03-27T09:28:37+5:30
सदर प्रकरणाची महिती मिळाल्यावर मुख्याधिकारी गजानन शिंदे अचानक शाळेला भेट दिली असता

बदली शिक्षक ठेवणे पडले महागात, महिला शिक्षिका निलंबित
भोर - नगरपालिकेच्या शाळेतील महिला शिक्षिका भारती मोरे यांनी स्वत: ऐवजी दुसरी महिला (बदली शिक्षक) मुलांना शिकविण्यासाठी ठेवली होती. सदर महिलेने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे व भोर नगरपालिका प्रशासन अधिकारी राजकुमार बामणे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. बदली शिक्षक ठेवणे महिला शिक्षिकेला चांगलेच महागात पडले आहे.
सदर प्रकरणाची महिती मिळाल्यावर मुख्याधिकारी गजानन शिंदे अचानक शाळेला भेट दिली असता, ही घटना उघडकीस आली. मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित महिला शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले की, नगरपालिकेच्या महाराणा प्रताप शाळेवर गैरहजर असून, तिच्या जागेवर दुसरीच महिला विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. २१) दुपारी दोनच्या सुमारास शाळेस भेट दिली. त्यावेळी संबंधित शिक्षिका ही गैरहजर होती आणि तिच्या जागेवर दुसरीच महिला विद्यार्थ्यांना शिक्षण देताना आढळून आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे होल्डिंग लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
शिकवत असलेल्या बदली महिलेला संबंधित शिक्षिका पगार देत असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. संबंधित उपशिक्षिकेने नवीन महिलेला केव्हापासून शिकविण्यास ठेवले आहे? तिला किती पगार देण्यात येत होता? आणि विद्यार्थ्यांचे किती नुकसान केले विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे काम करीत आहेत.
शहरात नगरपालिकेच्या तीन शाळा असून, विद्यार्थी संख्या २७१ आहे. त्यासाठी ११ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, अशा प्रकारे शिक्षक जर शासनाची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे २६ पासून नगर परिषद सेवेतून तात्पुरते निलंबित करण्यात येत आहे. तसेच पुढे असाही आदेश देण्यात येत आहे की, निलंबन कालावधीत भारती दीपक मोरे (उपशिक्षिका, महाराणा प्रताप नगर परिषद शाळा क्र.१) यांना निलंबन कालावधीतील मुख्यालय भोर नगर परिषद भोर हे राहील. भारती दीपक मोरे यांना परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले.