शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

Pune Grand Tour : डेक्कनमध्ये पुणे ग्रॅण्ड टूरदरम्यान सायकलपटूंचा अपघात; वादाचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:29 IST

काही काळ सायकलपटूंमध्ये वादावादी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुणे -पुणे ग्रॅण्ड टूर सायकल स्पर्धेदरम्यान शुक्रवारी दुपारी डेक्कन परिसरात सायकलपटूंमध्ये अपघात झाल्याची घटना घडली. संभाजी महाराज पुतळ्याजवळील मार्गावर हा अपघात झाला असून त्यानंतर काही काळ सायकलपटूंमध्ये वादावादी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.अपघातानंतर काही सायकलपटूंमध्ये शाब्दिक वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर स्पर्धा पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली. व्हायरल व्हिडिओवर नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी आयोजकांच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान, पुण्यातील ऐतिहासिक भागातून मार्गस्थ झालेल्या पुणे ग्रॅण्ड टूर सायकल स्पर्धेच्या ९५ किलोमीटर अंतराच्या अखेरच्या ‘पुणे प्राइड लूप’ टप्प्यात आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनी दमदार कामगिरी केली. शुक्रवारी झालेल्या अंतिम टप्प्यात ली निंग स्टार संघाच्या श्नायर्को ॲलिक्सेईने १ तास ५६ मिनिटे ५४ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला.दोन टप्प्यांतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ल्यूक मडग्वेने संपूर्ण पुणे ग्रॅण्ड टूरचे विजेतेपद पटकावले. तर ली निंग स्टार संघाने सांघिक विजेतेपदावर आपले नाव कोरले. अपघाताची घटना घडूनही स्पर्धेचा उत्साह कायम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Grand Tour: Cyclist Accident During Deccan Leg, Video Goes Viral

Web Summary : Cyclists collided during Pune Grand Tour's Deccan leg, sparking arguments. Police intervened. Despite the accident, the race continued, with international cyclists excelling. Luke Mudgwe won overall.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे