शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

Pune crime: बारामतीत खळबळ...! पोक्सो आरोपीने पोलिस कोठडीत उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 09:58 IST

Pune crime: अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण; बेकायदेशीर गर्भपातामुळे डॉक्टरांवरही संशय

सोमेश्वरनगर (पुणे जि.) :बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने पोलिस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

रवींद्र व्यंकट गार्डी (वय ४८, रा. चव्हाण वस्ती, कोऱ्हाळे खुर्द, ता. बारामती) असे मृत आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपीवर आपल्या नात्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप होता. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती झाल्याची बाब समोर आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात या अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आल्याचे उघड झाले. ही माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. २४ एप्रिल रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपीला ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजता कर्तव्यावरील पोलिस कर्मचारी काही वेळासाठी बाहेर गेल्याचा फायदा घेत आरोपीने पांघरुणासाठी दिलेल्या चादरीची किनार फाडून दोर तयार केला आणि गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्याला तत्काळ होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी करत आहेत. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपासासाठी गुन्हा गुन्हे अन्वेषण पथकाकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.डॉक्टरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हया प्रकरणातील पीडित मुलगी अवघी १३ वर्षांची असल्याने घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. अशा परिस्थितीत संबंधित डॉक्टरांनी बेकायदेशीर गर्भपात कसा केला आणि कायद्यानुसार पोलिसांना माहिती का दिली नाही, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही आर्थिक फायद्यासाठी अशा गंभीर गुन्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा असून, यामुळे वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati: POCSO Accused Commits Suicide in Police Custody, Stirring Outrage

Web Summary : A POCSO accused, Ravindra Gardi, committed suicide in Wadgaon Nimbalkar police custody. He was accused of repeatedly raping a minor, who became pregnant. Police are investigating the illegal abortion and the role of doctors involved.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रBaramatiबारामती