पिंपरी : कौटुंबिक वादातून वडिलांना शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारल्याने एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. २ फेब्रुवारी) रात्री नऊच्या सुमारास खेड तालुक्यातील हेद्रुज येथे घडली.
अमोल बबन बच्चे (वय ३३, रा. हेद्रुज, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लहू एकनाथ बच्चे (वय ३१), पपेश एकनाथ बच्चे (४०), भरत किसन बच्चे (४७) आणि प्रदीप किसन बच्चे (वय ३८, सर्व रा. हेद्रुज, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील त्यांच्या आईला शिवीगाळ करत असताना संशयितांनी गैरसमज करून घेतला. फिर्यादी यांचे वडील संशयितांना शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज संशयितांना झाला. त्या कारणावरून संशयितांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले.
Web Summary : A young man in Hedruj, Khed, was brutally attacked with sticks and rods for confronting individuals who were verbally abusing his father due to a misunderstanding. Police have registered a case against the accused involved in the assault.
Web Summary : खेड़ के हेद्रुज में एक युवक पर अपने पिता के साथ दुर्व्यवहार करने वालों का विरोध करने पर लाठियों और रॉड से बेरहमी से हमला किया गया। गलतफहमी के कारण विवाद हुआ। पुलिस ने मारपीट में शामिल आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है।