स्वारगेट बलात्कार प्रकरणात गाडेच्या डीएनए अहवालाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:04 IST2025-03-25T08:56:54+5:302025-03-25T09:04:28+5:30

गाडेविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

pune crime Waiting for Dutta Gade DNA report in Swargate rape case | स्वारगेट बलात्कार प्रकरणात गाडेच्या डीएनए अहवालाची प्रतीक्षा

स्वारगेट बलात्कार प्रकरणात गाडेच्या डीएनए अहवालाची प्रतीक्षा

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आली असून, चाचणीचा अहवाल पोलिसांना अद्याप उपलब्ध झाला नाही.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंवरुन कुणाल कामराचं नवीन गाण; संजय राऊतांनी ट्विट केलं, उदय सामंत म्हणाले, 'खपवून घेणार नाही'

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी आरोपी गाडेने प्रवासी तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर गाडे पसार झाला. गाडे मूळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा आहे. पसार झाल्यानंतर गाडे गुनाट गावातील उसाच्या फडात लपून बसला होता. तीन दिवसांनी गाडेला तेथून अटक करण्यात आली. बलात्काराच्या घटनेला आज, मंगळवारी (दि. २५) एक महिना पूर्ण होत आहे. गाडेविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप डीएनए चाचणीचा अहवाला मिळालेला नाही, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

डीएनए चाचणीचा अहवाल मिळाल्यानंतर गाडेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. गाडे याचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. गाडेविरुद्ध तांत्रिक, तसेच न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणात पीडित तरुणीचा जबाब (कलम १६४ अन्वये) न्यायाधीशांसमोर नोंदवून घेण्यात आला आहे. तसेच, ज्या बसमध्ये गाडेने तरुणीवर बलात्कार केला होता त्या बसचा चालक आणि वाहक यांचेही जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.

Web Title: pune crime Waiting for Dutta Gade DNA report in Swargate rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.