Video : धक्का लागला अन्...! पुण्याच्या FC रोडवर तरुणांचा राडा
By किरण शिंदे | Updated: February 17, 2026 11:10 IST2026-02-17T11:09:56+5:302026-02-17T11:10:54+5:30
एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद अचानक पेटला आणि काही क्षणांत दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली.

Video : धक्का लागला अन्...! पुण्याच्या FC रोडवर तरुणांचा राडा
पुणे - पुण्यातील गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरात दोन तरुणांच्या गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरही त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, FC रोड परिसरात काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद अचानक पेटला आणि काही क्षणांत दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
CCTV मध्ये कैद झालेला प्रकार
घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत असून, त्यामध्ये तरुण एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे संबंधित तरुणांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
FC रोडवर पुन्हा सुरक्षेचा प्रश्न
FC रोड परिसर हा विद्यार्थ्यांचा आणि पर्यटकांचा आवडता ठिकाण आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.