Video: पुण्यात दबक्या पावलांनी आला अन् लॅपटॉप घेऊन पळाला, चोरट्याचा प्रताप CCTV कॅमेरात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 14:01 IST2026-04-07T14:00:19+5:302026-04-07T14:01:37+5:30

- संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शांतपणे रूममध्ये प्रवेश केला आणि आत ठेवलेले तीन महागडे लॅपटॉप चोरून नेले.

pune crime video He came to Pune with slow steps and ran away with his laptop, the thief's prowess was caught on CCTV camera | Video: पुण्यात दबक्या पावलांनी आला अन् लॅपटॉप घेऊन पळाला, चोरट्याचा प्रताप CCTV कॅमेरात कैद

Video: पुण्यात दबक्या पावलांनी आला अन् लॅपटॉप घेऊन पळाला, चोरट्याचा प्रताप CCTV कॅमेरात कैद

पुणे : शहरातील वाघोली परिसरात निष्काळजीपणाचा फायदा घेत चोरट्याने लॅपटॉप चोरी केल्याची घटना समोर आली आहे. बाईफ रोडवरील आयडीबीआय बँकेजवळ असलेल्या एका रूममध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिकच्या माहितीनुसार, सकाळी सुमारे साडेसातच्या दरम्यान संबंधित युवक जिमसाठी बाहेर पडताना रूमचा दरवाजा पूर्णपणे लॉक न करता फक्त लोटून गेला होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शांतपणे रूममध्ये प्रवेश केला आणि आत ठेवलेले तीन महागडे लॅपटॉप चोरून नेले.



ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून फुटेजमध्ये चोरट्याची हालचाल दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा पोलिसांचा विश्वास आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना दरवाजे व्यवस्थित लॉक करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title : पुणे: चुपके से लैपटॉप चुराता चोर; सीसीटीवी में कैद

Web Summary : पुणे के वाघोली में, एक चोर ने आईडीबीआई बैंक के पास एक खुले कमरे से लैपटॉप चुरा लिए। सीसीटीवी में कैद घटना में चोर जिम गए निवासी के पीछे कमरे में प्रवेश करता है। पुलिस जांच कर रही है और निवासियों को दरवाजे सुरक्षित रूप से बंद करने का आग्रह करती है।

Web Title : Pune Thief Stealthily Steals Laptops; CCTV Captures Act

Web Summary : In Pune's Wagholi, a thief stole laptops from an unlocked room near IDBI Bank. The incident, captured on CCTV, shows the thief entering while the resident was at the gym. Police are investigating and urge residents to lock doors securely.