पुणे : गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून ३ जर्मन शेफर्ड कुत्री एकाच्या अंगावर सोडण्याचा प्रकार घडला. त्यातील एक कुत्रा पायाला चावल्याने रक्तस्राव झाला. एवढ्यावरच न थांबता कुत्र्याच्या मालकाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने कुत्र्याच्या मालकावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रोहन राजेंद्र जांभूळकर (वय ३९) हे जखमी झाले आहेत. याबाबत राजेंद्र एकनाथ जांभूळकर (वय ६५, रा. वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कुत्र्याचा मालक जॉन गेगरी फर्नांडिस (वय ५७, रा. आझादनगर, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २९ मार्चला दुपारी २ वाजता आझादनगरमधील रस्त्यावर घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभूळकर यांची आझादनगरमध्ये तीन गुंठे वडिलोपार्जित जमीन आहे. या जागेत त्यांनी बांधकाम सुरू केले आहे. बांधकामाकरिता विटांचा ट्रक आला. विटा खाली करायच्या होत्या. जांभूळकर यांच्या जागेच्या गेटसमोर जॉन फर्नांडिस याने त्याच्या मालकीची चार चाकी व दुचाकी पार्क केली होती. त्यामुळे विटांचा ट्रक आत नेता येत नव्हता. तेव्हा जांभूळकर यांनी गेटसमोर पार्क केलेली वाहने काढून घेण्याची विनंती केली.
तेव्हा त्याने ही वाहने काढून घेण्यास नकार दिला. मुद्दाम भांडणे करण्यास सुरुवात केली. जांभूळकर व त्यांचा मुलगा रोहन यांनी फर्नांडिस याच्याशी वाद न घालता ही वाहने बाजूला सरकावण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा जॉन फर्नांडिस याने त्याची ३ पाळीव जर्मन शेफर्ड कुत्री त्यांच्या अंगावर सोडली. त्यापैकी एका कुत्र्याने रोहन यांच्या डाव्या पायाच्या पोटरीचा जोराचा चावा घेतला. त्यांच्या पायाला मोठी जखम होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर जॉन फर्नांडिस याने हातील वस्तूने दोघा बाप-लेकांच्या अंगावर धावून त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिस हवालदार क्षीरसागर तपास करीत आहेत.
Web Summary : Pune: A man unleashed his German Shepherds after a parking dispute. One person was bitten, leading to an assault and threats. Police filed a case against the dog owner, John Fernandes.
Web Summary : पुणे: पार्किंग विवाद के बाद एक व्यक्ति ने अपने जर्मन शेफर्ड कुत्ते छोड़ दिए। एक व्यक्ति को काटा गया, जिससे मारपीट और धमकियां मिलीं। पुलिस ने कुत्ते के मालिक, जॉन फर्नांडीस के खिलाफ मामला दर्ज किया।