नारायणगाव : गाडी मागे घेण्याच्या कारणावरून नारायणगाव येथील भरचौकात हातात धारदार कोयता घेऊन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रोहन गणपत सपकाळ (वय. २४ रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यश जयसिंग भुजबळ (रा. नंबरवाडी, वारूळवाडी, ता. जुन्नर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिलेल्या माहिती नुसार, यश जयसिंग भुजबळ हे दिनांक २८ जानेवारी रोजी रात्री ११:३० वाजता नारायणगाव खोडद रोड येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी गेले असता रोहन सपकाळ याने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून हातात धारदार कोयता घेऊन येऊन तुला कापून टाकीन असे धमकी दिली. पोलिसांनी रोहन सपकाळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार हे करीत आहेत.
Web Summary : Narayanagaon: A youth, Rohan Sapkal, threatened Yash Bhujbal with a sickle over a car parking issue near an ATM. Police have registered a case.
Web Summary : नारायणगांव: एटीएम के पास कार पार्किंग को लेकर विवाद में रोहन सपकाल ने यश भुजबल को हंसिया से धमकाया। पुलिस ने मामला दर्ज किया।