Video : लग्नाआधी अपहरणाची खळबळ..! भिगवण प्रकरणात कॉल-मेसेजचा धागा पोलिसांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:30 IST2026-02-18T10:29:52+5:302026-02-18T10:30:47+5:30
आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

Video : लग्नाआधी अपहरणाची खळबळ..! भिगवण प्रकरणात कॉल-मेसेजचा धागा पोलिसांच्या हाती
भिगवण ( जि. पुणे) - भिगवण परिसरात मंगळवारी (दि. १७) दुपारी सुमारे चारच्या सुमारास २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली. आईसोबत दुचाकीवरून जात असताना दोन युवकांनी आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून तरुणीला जबरदस्तीने घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
या प्रकरणी दोन सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची नावे जाहीर हारून शेख व आयान हारून शेख (रा. शेख वस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) अशी आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार! भरदिवसा आई अन् भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचे अपहरणhttps://twitter.com/hashtag/pune?src=hash&ref_src=twsrc%5Etfw">#punehttps://twitter.com/hashtag/crime?src=hash&ref_src=twsrc%5Etfw">#crimehttps://twitter.com/hashtag/mahararashtra?src=hash&ref_src=twsrc%5E…">#mahararashtrahttps://t.co/bvONcSDhdH">pic.twitter.com/bvONcSDhdH
— Lokmat (@lokmat) https://twitter.com/lokmat/status/2023976966311870832?ref_src=twsrc%5Et…">February 18, 2026
ते पुढे म्हणाले, अपहरण झालेल्या तरुणीचे अवघ्या पाच दिवसांवर लग्न ठरले होते. त्यामुळे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी व तरुणी एकाच वस्तीतील असल्याने अपहरणामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडिता व आरोपी यांच्यात पूर्वी टेस्ट कॉल व मेसेजद्वारे संपर्क झाल्याचे दिसून आले आहे. सध्या दोघांचे मोबाईल फोन बंद असून ते एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांचा वाढीव बंदोबस्त
पोलीस यांच्या वतीने परिसरात वाढीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता बाळगण्यात येत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी नागरिकांना आवाहन केले की, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही बेकायदेशीर किंवा चुकीच्या प्रतिक्रिया देऊ नयेत. “पोलीस योग्य तपास करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. सर्वांनी शांतता राखावी,” असे त्यांनी सांगितले.