पुणे : वाघोलीतील बकोरी फाटा येथे महाविद्यालयीन तरुणाला जुन्या भांडणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दहशत पसरवणाऱ्या गुंडांची वाघोली पोलिसांनी त्याच परिसरात वरात काढली. अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटे (२५), ईशप्प उर्फ विशाल जगन्नाथ पंदी (२४), मंगेश भगवान निखाते (२३), जिवक संजय ओव्हाळ (२०), आदित्य बापू शिंदे (२५) आणि ओम प्रवीण कुसाळकर (२०, सर्व रा. वाघोली) अशी अटक केलेल्या गुंडांची नावे आहेत.
याबाबत संघर्ष सुनील सातव (रा. वाघोली) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र बकोरी फाटा येथील एका गेमझोनमध्ये पुलटेबल खेळत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले.
त्यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून गुंडांनी संघर्ष सातव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. याबाबत वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले की, मुन्ना पटेल, विशाल पंदी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या भागातील महाविद्यालयीन परिसरात तरुणांना मारहाण करुन ते आपली दहशत पसरवत होते.
Web Summary : Wagholi police paraded goons who assaulted a college student over old disputes. The arrested individuals, including known criminals, had been creating terror in the area. They were apprehended following a complaint filed for assault at Bakori Phata.
Web Summary : वाघोली पुलिस ने कॉलेज के छात्र पर पुराने विवादों के कारण हमला करने वाले गुंडों का परेड निकाला। गिरफ्तार किए गए लोगों ने इलाके में आतंक मचा रखा था। बकोरी फाटा में मारपीट की शिकायत के बाद उन्हें पकड़ा गया।