माझ्यासोबत राहा, नाहीतर…; एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणारा आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:45 IST2026-01-27T19:43:43+5:302026-01-27T19:45:03+5:30

पुणे : मजुरी कामासाठी एकत्रितपणे काम करणा-यानेच एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी हा सराईत ...

pune crime stay with me, otherwise Gajaad, the accused who murdered a woman due to one-sided love | माझ्यासोबत राहा, नाहीतर…; एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणारा आरोपी गजाआड

माझ्यासोबत राहा, नाहीतर…; एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणारा आरोपी गजाआड

पुणे : मजुरी कामासाठी एकत्रितपणे काम करणा-यानेच एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खेड पोलीस ठाण्यामध्ये २००७ व २०१८ मध्ये दोन तर २०२६ मध्ये दोन असे आतापर्यंत ४ खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

जैतू चिंधू बोरकर (वय ४३, रा. कोयंडे, ता. खेड) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने रंजना अरुण वाघमारे (वय ३५, रा. खांडपे, ता. कर्जत, जि़ रायगड) आणि सूरज अंकुश वाघ (वय ३०, रा. वांगणी, ता. बदलापूर, जि़ ठाणे) या दोघांचा खून केला असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळखैरेवाडी ( ता. बारामती) येथील खैरेपडळ येथे एका महिलेचा मृतदेह दि. १९ जानेवारी रोजी सकाळी आढळून आला होता. तिच्या डोक्यावर जखमा झालेल्या होत्या. खुनाचा हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सुपा पोलीस ठाण्यातील पथक शोध घेत होते. घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयित व्यक्तीची हालचाल दिसून आली. घटनास्थळावर एक डायरी मिळाली होती. या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे लालासाहेब मारुती जाधव (रा. पिसर्वे, ता. पुरंदर) यांच्याकडे चौकशी केली. त्यांना फुटेज दाखविले असता त्यांनी संशयित जैतू बोरकर असल्याचे सांगितले. जैतू बोरकर याला खेड परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर जैतू बोरकर याचे रंजना वाघमारे हिच्यावर एकतर्फी प्रेम होते.

तो तिला त्याच्या सोबत राहण्याची जबरदस्ती करत होता. महिलेने विरोध दर्शविल्यामुळे जैतू बोरकर याने रागाच्या भरात १७ जानेवारी रोजी रात्रीचे वेळी कोयंडे गावातील चोर्याचा डोंगर परिसरात सूरज वाघ याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण करुन त्याचा खून केला. रंजना वाघमारे हिने त्याचे सोबत राहण्यास नकार दिला. ती पोलिसांकडे तक्रार करेल, या भीतीने जैतू बोरकर याने तिच्या डोक्यात दगड मारुन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. खेड पोलीस ठाण्यात सुरज वाघ याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, जैतू बोरकर याला अटक करण्यात आली आहे. 

Web Title : पुणे: एकतरफा प्यार में महिला की हत्या, आरोपी गिरफ्तार

Web Summary : पुणे में एक सनकी प्रेमी ने महिला को प्रपोजल ठुकराने पर मार डाला। आरोपी जैतू बोरकर एक सीरियल किलर है और उसने महिला के दोस्त की भी हत्या कर दी। उसे खेड़ पुलिस ने गिरफ्तार कर लिया है।

Web Title : Rejected Lover Kills Woman; Accused Arrested in Pune Murder Case

Web Summary : A jilted lover in Pune murdered a woman who refused his advances. The accused, Jaitu Borkar, a serial killer, also murdered her friend. He has been arrested by Khed police for the double homicide.