राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट विदेशी दारू विरुद्ध धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 19:09 IST2025-07-23T16:15:32+5:302025-07-23T19:09:09+5:30

बनावट विदेशी दारूच्या विरुद्ध धडक कारवाई करून बनावट दारू व चारचाकी वाहनासह ६ लाख २२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

pune crime State Excise Department takes strong action against fake foreign liquor | राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट विदेशी दारू विरुद्ध धडक कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट विदेशी दारू विरुद्ध धडक कारवाई

बारामती : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने तालुक्यात बनावट विदेशी दारूच्या विरुद्ध धडक कारवाई करून बनावट दारू व चारचाकी वाहनासह ६ लाख २२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क बारामती विभागाचे निरीक्षक शहाजी शिंदे यांनी दिली.

शिंदे यांनी वंजारवाडी गावाच्या हद्दीत भिगवण-बारामती रोड वरील हॉटेल ब्रम्हचैतन्य जवळ बारामती येथे गोपनीय खात्रीलायक माहितीनुसार एका संशयित चारचाकी मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी थांबवून तपासणी केली. यावेळी वाहनात बनावट विदेशी मद्याचे रॉयल स्टॅग व्हिस्कीचे आणि इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीचे प्रत्येकी १८० मिली क्षमतेचे पाच बॉक्स मिळून आल्याने दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल वाहनासह जप्त करून ताब्यात घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

या गुन्ह्यात आरोपी अमोल सदाशिव शिंदे (वय ३८, रा. देवळाली, ता. करमाळा, जि. सोलापूर) यास अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत उत्पादन शुल्क हडपसरचे उपअधीक्षक उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक सागर साबळे, गिरीशकुमार कर्चे, प्रदीप झुंजरूक, मयूर गाडे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश जाधव व जवान निखिल देवडे, सुरेश खरात, सागर दुबळे, संकेत वाझे, डी. जे. साळुंके यांनी भाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक सागर साबळे करीत आहेत, असे निरीक्षक शहाजी शिंदे यांनी सांगितले.

Web Title: pune crime State Excise Department takes strong action against fake foreign liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.