Pune: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्याला सात वर्ष शिक्षा, नारायणगाव परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 17:01 IST2023-12-14T17:00:32+5:302023-12-14T17:01:10+5:30
राजगुरूनगर ( पुणे ) : नारायणगाव पोलिस ठाण्यांतर्गत डिसेंबर २०१० साली एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास राजगुरूनगर ...

Pune: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्याला सात वर्ष शिक्षा, नारायणगाव परिसरातील घटना
राजगुरूनगर (पुणे) : नारायणगाव पोलिस ठाण्यांतर्गत डिसेंबर २०१० साली एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी ७ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सचिन खंडू पानसरे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या खटल्याची माहिती अशी, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर २०१० साली एक पिकअप चालकाने ओळखीतील मुलीच्या घरी जाऊन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. नारायणगाव पोलिस ठाण्यात याबाबत पीडित मुलीने फिर्याद दिली होती. येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात मुख्य न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या पुढे सुरू होता. त्याचा निकाल जाहीर करीत आरोपीला त्यांनी शिक्षा ठोठावली.