Pune Crime : मित्राच्या वाढदिवसासाठी रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले; बर्थडे पार्टी थेट जेलमध्ये 

By किरण शिंदे | Updated: March 2, 2026 16:46 IST2026-03-02T16:46:01+5:302026-03-02T16:46:31+5:30

- लुबाडलेले २५ हजार रुपये घेऊन सर्व मित्र एकत्र जमले. अमोल गायकवाडचा वाढदिवस जोरदार साजरा करण्यात आला.

Pune Crime Rickshaw driver robs passenger for friend's birthday; Birthday party ends in jail | Pune Crime : मित्राच्या वाढदिवसासाठी रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले; बर्थडे पार्टी थेट जेलमध्ये 

Pune Crime : मित्राच्या वाढदिवसासाठी रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले; बर्थडे पार्टी थेट जेलमध्ये 

पुणे - खिशात पैसे नव्हते, मात्र काहीही करून त्यांना मित्राचा वाढदिवस थाटामाटात साजरा करायचा होता. मग काय त्यांनी थेट लुटीचा प्लॅन आखला.. ठरल्याप्रमाणे त्यांनी एकाची लूटही केली. मात्र वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी हे सर्वजण पोलीसांच्या जाळ्यात अडकले आणि तुरुंगात पोहोचले. ही धक्कादायक घटना २३ फेब्रुवारीच्या रात्री पुण्यात घडली.

गुलटेकडी परिसरातील डायस प्लॉट येथे राहणारे गणेश अण्णा जगधने (२९), अमोल उत्तम गायकवाड (३२), अतुल रवींद्र गायकवाड (३८) आणि संतोष राधाकिशन सरोदे (३१) यांनी अमोल गायकवाडचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचा बेत आखला. मात्र पैशांची कमतरता असल्याने त्यांनी गुन्हेगारीचा मार्ग निवडला. चौघांपैकी एक जण रिक्षा चालवत होता. त्यांनी ठरवले की प्रवाशाला रिक्षात बसवून एकांत ठिकाणी नेऊन लुटायचे. त्यानुसार स्वारगेट परिसरातून पुणे स्टेशनला जाणारा सत्येंद्र महतो (४१, सिवान, बिहार) हा बांधकाम मजूर त्यांच्या जाळ्यात सापडला.

स्टेशनला सोडतो असे सांगून एका आरोपीने सत्येंद्र यांना रिक्षात बसवले. काही अंतरावर जाऊन रिक्षा थांबली. त्यानंतर इतर तीन आरोपी रिक्षात बसले. त्यानंतर मात्र रिक्षा स्टेशनकडे न नेता भलत्याच दिशेला वळवण्यात आले. आणि निर्जन ठिकाणी रिक्षा घेऊन जात सत्येंद्र महतो याला ठार मारण्याची धमकी देत त्याच्याकडून ऑनलाइन २५ हजार रुपये उकळण्यात आले आणि नंतर सोडून देण्यात आले.

लुबाडलेले २५ हजार रुपये घेऊन सर्व मित्र एकत्र जमले. अमोल गायकवाडचा वाढदिवस जोरदार साजरा करण्यात आला. चौघांनीही प्रचंड मद्यपान केले. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. लुबाडणूक झालेल्या सत्येंद्र महतो यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी ज्या पेट्रोल पंपावर थांबले होते तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांनाही अटक केली. वाढदिवस साजरा करण्यासाठी रचलेला लुटीचा प्लॅन शेवटी तुरुंगात नेऊन पोहोचला. थोड्याशा आनंदासाठी निवडलेला गुन्हेगारी मार्ग अखेर या चौघांना तुरुंगात घेऊन गेला. 

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस कर्मचारी प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, प्रदीप शितोळे आदींच्या पथकाने पार पाडली.

Web Title : जन्मदिन की लूट: रिक्शा चालक ने यात्री को लूटा, पार्टी जेल में खत्म हुई।

Web Summary : पुणे: दोस्त का जन्मदिन मनाने के लिए बेताब, एक रिक्शा चालक सहित चार लोगों ने एक यात्री को लूट लिया। उन्होंने ₹25,000 वसूले और अगले ही दिन गिरफ्तार कर जेल भेज दिए गए। पीड़ित ने अपराध की सूचना दी, जिससे सीसीटीवी फुटेज के माध्यम से उनकी तेजी से गिरफ्तारी हुई।

Web Title : Birthday heist: Rickshaw driver robs passenger, party ends in jail.

Web Summary : Pune: Desperate to celebrate a friend's birthday, four men, including a rickshaw driver, robbed a passenger. They extorted ₹25,000 before being arrested and jailed the next day. The victim reported the crime, leading to their swift capture via CCTV footage.