Pune Crime : दहा वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला २५ वर्षांचा कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 16:29 IST2026-04-11T16:29:35+5:302026-04-11T16:29:45+5:30

पुणे : मोठ्या बहिणीच्या मृत्यूनंतर संगोपनासाठी तिच्या अल्पवयीन मुलीला छोट्या बहिणीने घरी आणले. मात्र, मेव्हणीच्या या दहा वर्षीय अल्पवयीन ...

Pune Crime rape of 10-year-old girl; Accused gets 25 years in prison | Pune Crime : दहा वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला २५ वर्षांचा कारावास

Pune Crime : दहा वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला २५ वर्षांचा कारावास

पुणे : मोठ्या बहिणीच्या मृत्यूनंतर संगोपनासाठी तिच्या अल्पवयीन मुलीला छोट्या बहिणीने घरी आणले. मात्र, मेव्हणीच्या या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने २५ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.  या प्रकरणात, फिर्यादी असलेली आरोपीची पत्नी फितूर झाल्यानंतरही विशेष न्यायाधीश एच.एम. भोसले यांनी पीडितेच्या बाजूने निकाल दिला. 

दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, तसेच दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालादरम्यान नमूद केले. ही घटना २०१८ पासून मे २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी, आरोपीच्या पत्नीने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी काम पाहिले. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर करीत २५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Web Title : पुणे: 10 वर्षीय भतीजी से बलात्कार, आरोपी को 25 साल की सजा

Web Summary : पुणे की एक अदालत ने एक व्यक्ति को अपनी 10 वर्षीय भतीजी के साथ बलात्कार करने के आरोप में 25 साल की कैद और जुर्माने की सजा सुनाई। पत्नी के मुकर जाने के बावजूद, न्यायाधीश ने पीड़िता के पक्ष में फैसला सुनाया और मुआवजे का आदेश दिया।

Web Title : Pune: Man gets 25 years for raping 10-year-old niece.

Web Summary : A Pune court sentenced a man to 25 years imprisonment and a fine for sexually assaulting his 10-year-old niece. Despite the wife turning hostile, the judge ruled in favor of the victim, ordering compensation.