पुणे हादरले..! उधारीच्या २० रुपयावरून वाद, मित्राच्या गळ्यावर वार

By किरण शिंदे | Updated: February 27, 2026 17:21 IST2026-02-27T17:16:50+5:302026-02-27T17:21:47+5:30

पोलिसांनी तातडीने पथक तयार करून शोधमोहीम राबवली आणि काही तासांतच त्याला लातूर येथून अटक करण्यात आली.

pune crime pune shaken argument over Rs 20 loan, friend stabbed in the neck | पुणे हादरले..! उधारीच्या २० रुपयावरून वाद, मित्राच्या गळ्यावर वार

पुणे हादरले..! उधारीच्या २० रुपयावरून वाद, मित्राच्या गळ्यावर वार

पिंपरी -  अवघ्या २० रुपयांच्या उधारीवरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेत मित्रानेच मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड परिसरात घडली. या प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांत लातूर येथून अटक केली.

घटना नेमकी काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड आणि सत्यजित उर्फ सोन्या कांबळे हे दोघे एकमेकांचे परिचित व मित्र होते. बुधवारी रात्री आठच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढत गेला आणि “माझे तुझ्याकडे २० रुपये उधार आहेत” असे म्हणत संतापाच्या भरात सत्यजितने धारदार शस्त्राने रवींद्रच्या गळ्यावर वार केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत रवींद्रला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांची तत्पर कारवाई

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी सत्यजित कांबळे हल्ल्यानंतर फरार झाला होता. पोलिसांनी तातडीने पथक तयार करून शोधमोहीम राबवली आणि काही तासांतच त्याला लातूर येथून अटक करण्यात आली.

मैत्रीचे नाते झाले रक्तरंजित

रवींद्र आणि सत्यजित हे रोज एकत्र उठबस करणारे मित्र होते. त्यांच्या मैत्रीची उदाहरणे परिसरात दिली जायची. मात्र अवघ्या २० रुपयांच्या कारणावरून मित्राने मित्राच्या जीवावर उठल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

समाजात वाढती हिंसा चिंताजनक

अत्यंत क्षुल्लक कारणावरून घडलेली ही घटना समाजातील वाढत्या हिंसेचे द्योतक असल्याचे मत व्यक्त होत आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title : पुणे में सनसनी: ₹20 के लिए विवाद, दोस्त ने मारा गला

Web Summary : पिंपरी-चिंचवड में ₹20 के विवाद में दोस्त ने दोस्त का गला रेता। आरोपी लातूर से गिरफ्तार। पीड़ित गंभीर हालत में अस्पताल में भर्ती। घटना समाज में बढ़ती हिंसा को दर्शाती है।

Web Title : Pune Shaken: Argument over ₹20 Debt, Friend Stabs Neck

Web Summary : Pimpri-Chinchwad was shocked as a dispute over ₹20 led to a friend stabbing another's neck. The suspect was arrested in Latur. The victim is hospitalized in critical condition. The incident highlights growing societal violence.