पुणे पोलिस करणार ८०० किलो ड्रग्जची होळी; रांजणगावातील एमआयडीसीमध्ये होणार नाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:11 IST2025-03-25T09:11:10+5:302025-03-25T09:11:52+5:30

तस्करांकडून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांमधून गांजाची पुण्यात तस्करी केली जाते.

Pune crime Police will hold Holi with 800 kg of drugs | पुणे पोलिस करणार ८०० किलो ड्रग्जची होळी; रांजणगावातील एमआयडीसीमध्ये होणार नाश

पुणे पोलिस करणार ८०० किलो ड्रग्जची होळी; रांजणगावातील एमआयडीसीमध्ये होणार नाश

पुणे : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे कंबरडे मोडल्यानंतर पोलिसांकडून आता मंगळवारी (दि. २५) जप्त केलेल्या ड्रग्जची होळी केली जाणार आहे. २०२४ मध्ये पुण्यातील विविध भागातून तब्बल अमली पदार्थ विरोधी पथकांनी ७ कोटी ७६ लाखांचे ७८८ किलो अमली पदार्थ जप्त केले होते. संबंधित जप्त अमली पदार्थ रांजणगाव एमआयडीसीत नष्ट केले जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

तस्करांकडून कोकेन, गांजा, चरस, मॅफेड्रोन, ब्राऊनशुगर, अफू, एल.एस.डी. यासारखे जप्त पदार्थांची होळी केली जाणार आहे. अमली पदार्थ विरोधी पथकांनी २०२४ मध्ये तब्बल ७८८ किलोेेंवर ड्रग्ज जप्त केले होते. त्यामध्ये सर्वाधिक ७५८ किलो गांजाचा समावेश आहे. तर १ कोटी ४१ लाखांचे इफेड्रीन, ४८ लाखांचे कोकेन, १ कोटी ५२ लाखांचे एलएसडी, १ लाख ८५ हजारांचे चरस, ४ लाख २७ हजारांचे अफिम, ३९ लाखांचे हेरॉईन, १३ हजारांची बंटी गोळी अशाप्रकारे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ७ कोटी ७६ लाखांचे ड्रग्ज जप्त केले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार ड्रग डिस्पोजल कमिटीसह वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्यातंर्गत वरिष्ठ निरीक्षकांच्या उपस्थितीत नष्ट केले जाणार आहे.

जप्त केलेल्या ड्रग्जमध्ये सर्वाधिक गांजाचा समावेश आहे. तस्करांकडून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांमधून गांजाची पुण्यात तस्करी केली जाते. बेकायदेशीरपणे पुणे, मुंबई आणि इतर शहरांत तस्करांची साखळी कार्यरत असल्याचे उघडकीस आले. गांजानंतर एमडीला जास्त मागणी असून मुंबईतून तस्करी केली जाते. दरम्यान, पुणे पोलिसांनी १ हजार ८०० किलोवर जप्त केलेले मेफेड्रॉन काही दिवसांनी नष्ट केले जाणार आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुर्दशन गायकवाड यांनी केली.

 

Web Title: Pune crime Police will hold Holi with 800 kg of drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.