Pune Crime :मैत्रिणीला फोन करण्यावरून वाद, कोयत्याचा घाव; पुण्यात मित्रानेच केला मित्रावर हल्ला;थरार CCTV कॅमेऱ्यात

By किरण शिंदे | Updated: February 4, 2026 15:22 IST2026-02-04T15:22:41+5:302026-02-04T15:22:56+5:30

जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून वाद; एकाचा दुसऱ्यावर कोयता हल्ला; थरार CCTV कॅमेऱ्यात

Pune Crime Phone dispute, knife wound; Friend attacks friend in Pune | Pune Crime :मैत्रिणीला फोन करण्यावरून वाद, कोयत्याचा घाव; पुण्यात मित्रानेच केला मित्रावर हल्ला;थरार CCTV कॅमेऱ्यात

Pune Crime :मैत्रिणीला फोन करण्यावरून वाद, कोयत्याचा घाव; पुण्यात मित्रानेच केला मित्रावर हल्ला;थरार CCTV कॅमेऱ्यात

पुणे - पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या मैत्रिणीला फोन करण्याच्या वादातून दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणाचं रूपांतर भयंकर घटनेत झालं. एकाने दुसऱ्यावर कोयत्याने वार केलेत. ही घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणातील जखमी तरुणाचं नाव चेतन चव्हाण (वय २३) असून, हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आदित्य कांबळे आहे. आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे दोघेही चांगले मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.


 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दोघेही भारती विद्यापीठ परिसरात उभे राहून गप्पा मारत होते. यावेळी बोलता बोलता जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. त्या मैत्रिणीला फोन लावायचा की नाही, यावरून दोघांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. हा वाद काही वेळातच वाढत गेला आणि त्याचं रुप गंभीर भांडणात बदललं.

वाद टोकाला गेल्यानंतर आदित्य कांबळे याने थेट कोयता काढून मित्र चेतन चव्हाणवर हल्ला केला. या हल्ल्यात चेतन चव्हाण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी चेतन चव्हाण याला तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आरोपी आदित्य कांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title : पुणे: फोन कॉल विवाद में दोस्त ने दोस्त पर किया कोयते से हमला।

Web Summary : पुणे में एक महिला मित्र को फोन करने के विवाद में एक हिंसक हमला हुआ। आदित्य कांबले ने अपने दोस्त चेतन चव्हाण पर कोयते से हमला किया, जिससे उसके सिर में गंभीर चोटें आईं। चव्हाण अस्पताल में हैं, और पुलिस जांच कर रही है, कांबले पर आरोप हैं।

Web Title : Pune: Friend attacks friend with sickle over phone call argument.

Web Summary : In Pune, a dispute over a phone call to a female friend escalated into a violent attack. Aditya Kamble attacked his friend, Chetan Chavan, with a sickle, causing severe head injuries. Chavan is hospitalized, and Kamble faces charges as police investigate.