आरोपीसाठी पोलिस ठाण्यात बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल आले ? पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 15:09 IST2025-03-09T15:08:51+5:302025-03-09T15:09:42+5:30
आरोपीसाठी पोलिस ठाण्यात बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल आले ? पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी स्पष्टच सांगितलं

आरोपीसाठी पोलिस ठाण्यात बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल आले ? पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी स्पष्टच सांगितलं
पुणे - येरवड्याच्या चौकात लघुशंका करत हटकणाऱ्यांना अश्लिल हावभाव करणाऱ्या गौरव आहुजाने साताऱ्यात कराडमध्ये जात पोलिसांना सरेंडर केले आहे. आहुजाने सकाळी दारु प्यायली होती, मग रात्री उशिरा सरेंडर का केले? दारुचा अंमल नष्ट करण्यासाठी हे केले असल्याचे आरोप होत आहेत. अशातच सर्व माध्यमांचे आहुजाकडे लक्ष असताना ही जेव्हा घटना घडली तेव्हा गाडीत दारुची बाटली घेऊन बसणारा त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला पोलीस ठाण्यात खाण्यासाठी त्याच्या मित्रांनी बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल आणल्याचे समोर आले आहे.
बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सलच्या मुद्द्यावर आता पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'काल सकाळी 7.30 वाजता शास्त्रीनगर भागात तरुणाकडून अश्लील वर्तन केले गेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता काल भाग्येश ओसवाल याला अटक केली होती. मुख्य आरोपी गौरव अहुजा याला सातारा येथून ताब्यात घेतलं आहे. या पुण्यातल्या दोन्ही आरोपींना आता आम्ही अटक केली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आलीय. वैद्यकीय प्राथमिक अहवाल आमच्याकडे आला आहे. पुढील तपास सुरु आहे. आरोपी कस्टडीत असेपर्यंत नियमाने ज्या गोष्टी आहेत जो भत्ता कायद्याप्रमाणे दिला जातो तोच भत्ता त्यांना देण्यात येईल बाहेरची कुठलीही गोष्ट त्यांना खायला देण्यात येणार नाही.
गौरव आहुजा साताऱ्यात का सरेंडर झाला
गौरव आहुजा पोलिसांना तोपर्यंत शरण जाणार नाही जोपर्यंत त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण पूर्णतः नाहीसे होत नाही, असे आपचे नेते व या प्रकरणात उघडपणे बोलणारे विजय कुंभार यांनी म्हटले होते. कारमध्ये त्याच्यासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल देखील होता, त्याच्या हातात दारुची बाटली दिसत आहे. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते आणि आहुजा हा गाडीही चालवत होता. तरीही या दोघांचा मेडिकल रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. यात जर आहुजा मद्यधुंद होता हे सिद्ध झाले नाही तर त्याला मोठा फायदा मिळू शकतो. यामुळे त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न झाले असावेत अशी शंका आता पुणेकरांना येत आहे.