काय सांगता..! पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने बेकायदेशीरपणे पिंपरी चिंचवडमध्ये; अधिवेशन संपण्यापूर्वी होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:54 IST2025-03-19T15:52:26+5:302025-03-19T15:54:08+5:30

आमदार भीमराव तापकीर यांनी केला पाकिस्तानी बेकायदेशीर उत्पादनांचा केला पर्दाफाश 

pune crime Pakistani cosmetics illegally imported into Pimpri Chinchwad | काय सांगता..! पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने बेकायदेशीरपणे पिंपरी चिंचवडमध्ये; अधिवेशन संपण्यापूर्वी होणार कारवाई

काय सांगता..! पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने बेकायदेशीरपणे पिंपरी चिंचवडमध्ये; अधिवेशन संपण्यापूर्वी होणार कारवाई

धनकवडी : पाकिस्तानच्या लाहोर मध्ये तयार करण्यात आलेला आणि आयातीचा परवाना नसलेला सौंदर्य प्रसाधनाचा मोठा साठा पिंपरी चिंचवड मध्ये सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार भीमराव तापकीर यांनी पिंपरी चिंचवड येथे जप्त केलेल्या सौंदर्य प्रसाधना विषयी प्रश्न उपस्थितीत केला. त्यावेळी खुद मंत्री झिरवळ यांनीच ही धक्कादायक गोष्ट सांगितली. विशेष म्हणजे हा साठा बेकायदेशीरपणे पाकिस्तानातून आयात करणाऱ्यांवर कारवाई झाली नसून अधिवेशन संपण्याआधी कारवाई होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार तापकीर म्हणाले की, धायरीमध्ये २० लाख ७२ हजार ४८७किमतीचा साठा प्रतिबंध करण्यात आला होता. हा साठा कर्नाटक, तेलंगनातून आला होता. मात्र हा साठा येथे आला कसा?, तो साठा येथे आणताना पुण्याच्या अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेतली होती का ? या शिवाय आगस्ट २०२४ मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आयात केलेला सौंदर्य प्रसाधना चा साठाही जप्त केला होता. मात्र तो जप्त केलेला साठा कोणत्या देशातून आला? तो कोणत्या नावाने विक्रीसाठी उपलब्ध आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही.  सध्या राज्यभरामध्ये सौंदर्य प्रसाधन लॅबची संख्या किती आहे? पुणे जिल्ह्यात सौंदर्य प्रसाधन उत्पादक व क्लिनीक ची संख्या किती आहे? आणि गैरमार्गाने काम करणाऱ्यां वर अन्न औषध प्रशासनाने किती कारवाई केली? असे गंभीर प्रश्न विचारत सभागृहाचे लक्ष वेधले. याला उत्तर देताना मंत्री झिरवळ म्हणाले की, पिंपरी चिंचवड मध्ये प्रतिबंधीत केलेला साठ्याचा विषय अतिशय गंभीर आहे. कारण हा साठा पाकिस्तानातील लाहोर मधून आला होता.

होरीक केमेस्ट्री या कंपनीने तो तयार केला आहे. विशेष म्हणजे विक्रेत्यांकडे आयात - निर्यातीचे परवाने नाहीत. त्यामुळे तो साठा आला कसा याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येईल अशी ग्वाहीही झिरवळ यांंनी आमदार तापकीर यांना दिली.  दुसरीकडे धायरी येथे प्रतिबंधीत केलेला साठ्याबाबत कारवाई बाबत ते म्हणाले की, धायरीत सापडलेल्या विक्रेत्यांकडे सौंदर्य प्रसाधाने विक्रिची परवानगी आहे. मात्र कर्नाटक आणि तेलंगणा येथील सौंदर्य प्रसाधाना बाबत परवानगी नव्हती त्यामुळे त्या उत्पादनांना प्रतिबंध करण्यात आला.

Web Title: pune crime Pakistani cosmetics illegally imported into Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.