निलेश घायवळ कुटुंबीयांच्या बँक खात्यांवर कारवाई; तब्बल ३८.२६ लाख रुपये फ्रीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:34 IST2025-09-30T18:33:49+5:302025-09-30T18:34:30+5:30
परदेश दौऱ्याच्या खर्चाबाबत आणि आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निलेश घायवळ कुटुंबीयांच्या बँक खात्यांवर कारवाई; तब्बल ३८.२६ लाख रुपये फ्रीज
पुणे - कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांवर पोलिस व आर्थिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत घायवळ कुटुंबाच्या तब्बल १० बँक अकाउंट्सवर टाच येत ३८ लाख २६ हजार रुपयांची रोकड फ्रीज करण्यात आली आहे.
फ्रीज करण्यात आलेल्या अकाउंटमध्ये शुभांगी सचिन घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ, निलेश घायवळ (२ वेगवेगळे खाते) आणि सचिन घायवळ यांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. ही खाती विविध बँकांमध्ये असून त्यामध्ये जमा असलेले सर्व पैसे आता वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, निलेश घायवळ ११ सप्टेंबर रोजी स्वित्झर्लंडला रवाना झाल्याची नोंद समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या परदेश दौऱ्याच्या खर्चाबाबत आणि आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घायवळ टोळीवर यापूर्वीच गंभीर गुन्हे दाखल असून, टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता त्यांच्या बेकायदेशीर उत्पन्नाच्या स्रोतांवरही पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.