पुणे : गॅसपुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ९ लाख १५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला अरण्येश्वर परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या संपर्क साधला होता. गॅसपुरवठा करणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली.
गॅस बिल पेंडिंग असल्याने पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. महिलेने शहानिशा न करता चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.
Web Summary : Pune: Cybercriminals posing as gas company representatives defrauded a senior citizen of ₹9.15 lakh by threatening to cut off gas supply due to a pending bill. Police have registered a case and are investigating.
Web Summary : पुणे: गैस कंपनी के प्रतिनिधि बनकर साइबर अपराधियों ने एक वरिष्ठ नागरिक को ₹9.15 लाख का चूना लगाया। बकाया बिल के कारण गैस आपूर्ति काटने की धमकी दी गई। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।