‘आम्ही कोयता गँगचे’ म्हणत दुकानात घुसून दोन भावांना बेदम मारहाण; शिक्रापुरात २० जणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:19 IST2026-02-27T15:19:00+5:302026-02-27T15:19:26+5:30

- ‘आम्ही कोयता गँगचे आहोत’, अशी धमकी देत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी २० युवकांविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pune crime news two brothers were brutally beaten up after entering a shop saying, 'We are from the Koyta gang'; 20 people were booked in Shikrapur | ‘आम्ही कोयता गँगचे’ म्हणत दुकानात घुसून दोन भावांना बेदम मारहाण; शिक्रापुरात २० जणांवर गुन्हा 

‘आम्ही कोयता गँगचे’ म्हणत दुकानात घुसून दोन भावांना बेदम मारहाण; शिक्रापुरात २० जणांवर गुन्हा 

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील तळेगाव रोड परिसरात कारला दुचाकीची धडक लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद वाढत जाऊन सुमारे वीस जणांच्या टोळक्याने दोन भावांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘आम्ही कोयता गँगचे आहोत’, अशी धमकी देत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी २० युवकांविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव रोड परिसरातील ‘एस आर ब्रँड हब’ या कपड्यांच्या दुकानाचे संचालक श्रीकांत नरके हे दुकानासमोर कार उभी करत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने कारला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार युवक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना श्रीकांत यांचा भाऊ राजेश नरके यांनी दुचाकीवरील आर्यन गडदरे व सार्थक गावडे यांना पकडले.

दरम्यान, दोन्ही युवकांनी दमदाटी सुरू केल्याने श्रीकांत व राजेश यांनी त्यांना दुकानात बसवले. त्यानंतर संबंधित युवकांनी त्यांच्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. काही वेळातच दुकानासमोर मोठे टोळके जमा झाले. टोळक्याने दुकानात घुसून शिवीगाळ करत दोघा भावांना बेदम मारहाण केली. तसेच कोयत्याने मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली.

शेजारील दुकानदारांनी तत्काळ धाव घेत दोघा भावांची सुटका केली. या मारहाणीत राजेश गोविंद नरके व श्रीकांत गोविंद नरके हे दोघे जखमी झाले आहेत. घटनेचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

फिर्यादी श्रीकांत नरके (वय ३५, रा. नरकेवाडी, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व दुकानातील सुमारे ७० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आर्यन गडदरे, सार्थक गावडे, अथर्व साळवे, कार्तिक सांवत, क्रिश चकोर, ओम गायकवाड, सार्थक कराळे, सोहम फिरोदिया यांच्यासह अन्य १२ अनोळखी युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बापू हाडगळे करीत आहेत, अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

Web Title : शिक्रापुर में 'कोयता गैंग' का हमला, दुकान में भाइयों की पिटाई; 20 पर मामला दर्ज

Web Summary : शिक्रापुर में मामूली टक्कर के बाद 'कोयता गैंग' बताकर एक गिरोह ने दो भाइयों पर हमला कर दिया। दुकान में मारपीट और लूटपाट के आरोप में बीस लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है।

Web Title : 'Koyta Gang' attacks brothers in shop; 20 booked in Shikrapur

Web Summary : A gang assaulted two brothers in Shikrapur, claiming to be from the 'Koyta Gang', following a minor vehicle collision. Twenty individuals are booked for the attack and robbery at the shop.