लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तरुणीवर अत्याचार;गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:42 IST2025-09-28T13:42:09+5:302025-09-28T13:42:19+5:30
तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तरुणीवर अत्याचार;गुन्हा दाखल
पुणे : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी, खडकी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. अरुण सुब्रमणी नेसमणी (२७, रा. खडकी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत २० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२३ ते २१ सप्टेंबर २०२५ दरम्यानच्या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या महाविद्यालयात जाऊन सोबत राहण्यासाठी हाताने मारहाण करून शिवीगाळ करत बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.