पोर्शे अपघात प्रकरण: डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 09:52 IST2026-03-05T09:51:09+5:302026-03-05T09:52:51+5:30

- डॉ. तावरेने जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२५ मध्ये फेटाळला होता.

Pune Crime News Porsche accident case Dr. Ajay Taware granted conditional bail by Supreme Court | पोर्शे अपघात प्रकरण: डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन 

पोर्शे अपघात प्रकरण: डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन 

पुणे : कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या ससून रुग्णालयाचा माजी फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. अजय तावरे याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. खटल्यात पूर्ण सहकार्य करावे, साक्षीदारांशी कोणताही संपर्क साधू नये आणि जामिनाच्या अटींचा गैरवापर करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द होईल, असेही आदेशात नमूद आहे.

१९ मे २०२४ च्या पहाटे कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलगा पोर्शे कार भरधाव वेगात चालवत असताना त्याने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातावेळी मुलगा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप झाला. अल्पवयीन चालकाच्या रक्तातील मद्याचे पुरावे लपवण्यासाठी ससून रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नावे समोर आली. त्यात डॉ. अजय तावरे याचादेखील सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले. जुलै २०२४ मध्ये पुणे पोलिसांनी सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. डॉ. अजय तावरे याच्यावरही या कथित कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्याला मे २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती आणि तो तेव्हापासून न्यायालयीन कोठडीत होता.

दरम्यान, डॉ. तावरेने जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२५ मध्ये फेटाळला होता. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणातील इतर काही सहआरोपींना आधीच जामीन मंजूर झाला आहे आणि आरोपी हा जवळपास एकवीस महिने तुरुंगात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंची बाजू ऐकून ‘समता तत्त्वा’चा आधार घेत तावरेला अटी-शर्तीवर जामीन दिला. 

Web Title : पोर्श दुर्घटना मामला: डॉ. अजय तावरे को सुप्रीम कोर्ट से सशर्त जमानत

Web Summary : पोर्श दुर्घटना मामले में खून के नमूनों से छेड़छाड़ के आरोपी डॉ. अजय तावरे को सुप्रीम कोर्ट से सशर्त जमानत मिली। उन्हें मुकदमे में सहयोग करना होगा और गवाहों से संपर्क नहीं करना होगा। अन्य सह-आरोपियों को जमानत मिल चुकी है, और तावरे लगभग 21 महीने से जेल में हैं।

Web Title : Porsche Accident Case: Dr. Ajay Taware Granted Conditional Bail by Supreme Court

Web Summary : Dr. Ajay Taware, accused in the Porsche accident case for tampering with blood samples, received conditional bail from the Supreme Court. He must cooperate with the trial and avoid witness contact. Other co-accused have been granted bail, and Taware has been jailed nearly 21 months.