Pune Crime: मुलगा जिवंत हवा असेल तर दोन लाख द्या, कुटुंबाला धमकीचा मेसेज;पोलिसांनी उघड केला बनाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:21 IST2026-02-25T18:21:01+5:302026-02-25T18:21:36+5:30
हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील असून, तो पुण्यात सुरक्षाक्षक म्हणून काम करतो.

Pune Crime: मुलगा जिवंत हवा असेल तर दोन लाख द्या, कुटुंबाला धमकीचा मेसेज;पोलिसांनी उघड केला बनाव
पुणे : स्वत:च्या अपहरणाचा बनाव करून कुटुंबीयांकडून दोन लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा तरुण बाणेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील असून, तो पुण्यात सुरक्षाक्षक म्हणून काम करतो.
मनीषकुमार द्विवेदी (रा. उत्तर प्रदेश) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्विवेदी हा बाणेर परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. उत्तर प्रदेशात निघालो असल्याचे सांगून तो ९ फेब्रुवारी राेजी कामावरून निघाला. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी एका अनोळखी क्रमांकावरून ‘तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. मुलगा जिवंत हवा असेल, तर त्वरित दोन लाख रुपये द्या. पोलिसांना माहिती दिल्यास त्याला जिवे मारू,’ असा धमकी देणारा मेसेज भाऊ आणि वडिलांच्या मोबाइलवर पाठवला. यानंतर त्याच्या वडिलांनी याची माहिती बाणेर पोलिसांना दिली.
बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास करून द्विवेदी हा अहमदाबादहून प्रयागराजला गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातून त्याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने स्वत: अपहणाचा बनाव रचल्याचे सांगितले.