ससूनच्या इमारतीवरून उडी मारून एकाची आत्महत्या
By नितीश गोवंडे | Updated: April 4, 2025 21:32 IST2025-04-04T21:31:00+5:302025-04-04T21:32:02+5:30
पुणे : ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. ४० च्या बाजूला असलेल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत एकाने आत्महत्या केली. दशरथ सुरेश ...

ससूनच्या इमारतीवरून उडी मारून एकाची आत्महत्या
पुणे : ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. ४० च्या बाजूला असलेल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत एकाने आत्महत्या केली. दशरथ सुरेश मेढे (३१, मूळ रा.राजूर, ता.मोताळा, जि.बुलढाणा) असे मयत इसमाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश मेढे यांना गुरुवारी (दि. ३) रात्री दारू पिऊन वेड्यासारखे वागत असल्यामुळे उपचारासाठी ससून रुग्णालयात भरती केले होते. या प्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.